Sinnar Flood Crop Damage esakal
नाशिक

Sinnar Flood news : ना वाचली पिके, ना शेती!

मुकुंद पिंगळे

नाशिक : वेळ-सायंकाळी सहा-सातच्या दरम्यानची... सगळं वातावरण मोकळं होतं ; अशातच आभाळ काळ होऊन जमा झालं अन् टपोऱ्या थेंबासह कोसळधार सुरू झाली. क्षणार्धात जणू आभाळच कोसळलं. त्यामुळे ना वाचली पिके अन शेतीही. ही कैफियत कातर स्वरात कोनांबे (ता. सिन्नर) येथील शेतकरी मधुकर डावरे यांची. (Sinnar Flood news extreme Damage to crop Nashik Latest Marathi News)

सिन्नर तालुक्यात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पश्चिम पट्ट्यात सर्वत्र दाणादाण उडाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोनांबे, कोनांबे, शिवडा या परिसरात शेती आणि पिकांचे होत्याचं नव्हतं झालं, अशी भयावह स्थिती झाली आहे. गुरुवारी (ता.१) सायंकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान १४४ मिलिमीटर पावसाची नोंद परिसरात झाली. त्याचा हा ‘गाऊंड रिपोर्ट'. सोनांबे शिवारात काही क्षणात सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूरस्थिती निर्माण झाली.

ओढे-नाले एक झाले. परिसरात गुरदरी पाझर तलाव सांडव्यातून मोठया प्रमाणावर विसर्ग झाल्याने नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रवाह बदलले. त्यामुळे अनेक शिवारात पाणी शिरल्याने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. अनेक ठिकाणी या तलावातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावर बांधलेले तीन लघू बंधारे फुटले. त्यामुळे पुढे नाल्यावर शेतकऱ्यांनी घराकडे जाणारे तीन ते चार लहान पुल तुटल्याने शेतकऱ्यांचा रस्त्यावर येता आले नाही. पुलाखाली टाकलेले सिमेंटचे पाईप दूरवर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले आहेत.

नाल्या लागतची पिके व जमीन मोठ्या प्रमाणावर खरवडून गेली. त्यामध्ये टोमॅटो, गाजर, वाटाणा, कोबी, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. पाणी सोनांबे गावातून भैरवनाथ मंदिरासमोरून वाहिले. गेल्या ५० वर्षांत गावठाण परिसरात अशी भयावह परिस्थिती स्थानिकांनी पाहिली नाही. गावठाण लगत कमरे एवढे पाणी वाहत होते, असे गावातील ८० वर्षांच्या आजी शकुंतला काशिनाथ पवार यांनी सांगितले.

तसेच कोनांबे येथील चिपटी मळा परिसरात जोरदार पावसामुळे डोंगरावरुन पाणी वाहून आल्याने डावरे कुटुंबियांनी शेतीसाठी केलेले दोन सिमेंट पूल व त्याखालील पाईप वाहून गेले. तसेच लगतचे १५ गुंठे क्षेत्र मातीसह वाहून गेले. लगतच्या क्षेत्रातील १५ एकर सोयाबीन मातीखाली दाबली गेले.

ठळक नोंदी

- पाण्याच्या लोंढ्यासोबत शेताचे बांध फुटले. शेतात ओहोळ तयार झाल्याची स्थिती

- शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्याने टोमॅटो, कोबी, गाजर व सोयाबीन लागवड प्रभावित ;भाजीपाला पिके पाण्याखाली, तर काही भाजीपाला पिकांचे अवशेष पाण्यावर तरंगत राहिलेत

- नाल्यालगतच्या भागातील विहरी मातीमुळे बुजल्या

- भाजीपाला, झाडे, ठिबक साहित्य, मलचिंग पेपर गेले वाहून

- खडकाळ जमिनीवर पोयटा व काळी मती टाकून जमीन पुनर्भरण केले होते, अशा क्षेत्रात उघडा खडक तयार झाला

- शेतीतील वस्त्यांवर जाण्यासाठी नाल्यांवर बांधलेले पूल वाहून गेल्याने शेतकरी कुटुंबाचा संपर्क तुटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, तो हिंसाचार...

Sourav Ganguly: चांगल्या खेळपट्टीवर खेळा अन् शमी जरा विश्वास ठेवा, गांगुलीने गौतम गंभीर स्पष्ट शब्दात सुनावलं

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

SCROLL FOR NEXT