SISU Movie esakal
नाशिक

SISU Movie Review : गोळीबंद कथा, दमदार अभिनय अन्‌ ब्र्यूटल व्हॉयलन्स

Tushar Maghade

"‘सिसू’ (Sisu) हा एक फिनिश शब्द, याचा अर्थ अतूट साहस, मजबूत इरादा. अगदी नावाप्रमाणेच चित्रपटात नायकाच्या साहसाचे दर्शन घडते. नायक वार्धक्याकडे झुकला असला तरी, दीड तास त्याचे शौर्य प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

लोणचे तोंडी लावतो, तसे गरजेपुरता संवाद आणि ब्र्यूटल व्हॉयलन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अतिरक्तरंजित दृश्‍य असल्यामुळे चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट आहे. अशाप्रकारच्या ॲक्शनच्या चाहत्यांना हा चित्रपट एक मेजवानी आहे.

काही ठिकाणी लॉजिक माती खात असले तरी वेगवान कथा आणि नायकाच्या अभिनयामुळे चित्रपट एन्जॉय करण्याची ताकद मिळते. संकलन, कॅमेरा, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच बाबतीत ‘सिसू’ वरचढ असून, तिकिटाचा खर्च वसूल झाल्याची भावना दाटून आल्याशिवाय राहत नाही.

‘जॉन वीक’ च्या ॲक्शन जॉनरचे चाहते जगभरात आहे. या चित्रपटाच्या तोडीस तोड ‘सिसू’ चित्रपट असून, प्रेक्षकांना क्षणभरही उसंत न देता खिळवून ठेवतो."
(SISU Movie Review Bulletproof story strong acting and brutal violence nashik new)

१९४४ चा काळ, जेव्हा सारे जग महायुद्धाच्या आगीत धुमसत होते. नाझी सैनिकांनी सगळीकडे हाहाकार माजविला होता. महायुद्ध समाप्तीवर आहे, येथून चित्रपटाची कथा सुरू होते. एक असा रिटायर्ड सैनिक ज्याने युद्ध मागे सोडून आपली वेगळी वाट निवडली आहे.

चित्रपटाचा नायक हा वार्धक्याकडे झुकलेला, सैन्यातून निवृत्त झालेला एक साहसी अधिकारी आहे. ही भूमिका जॉर्मा थॉमिला याने निभावली आहे. तशी चित्रपटाची कथा सरधोपट असून, कुठेही उपकथानक, फाटफुटे नाहीत. जे काही सांगायचे थेट आणि सात चॅप्टरच्या भन्नाट शैलीतून प्रेक्षकांसमोर वाढले आहे.

या शैलीमुळे चित्रपट मनोरंजनाची उणीव तसूभरही ठेवत नाही. चित्रपटाच्या नायकाला उत्खननात सोन्याचा मोठे घबाड हाती लागते. सोने मिळविण्यासाठी मागे लागलेले नाझी सैनिक आणि सोने वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करताना एक आख्खा नाझी सैनिकाच्या फलटणला भिडलेला नायक, अशी साधीसरळ कथा आहे.

चित्रपटाची लांबी ही एक तास ३१ मिनिटांची आहे. नायकाच्या तोंडी संपूर्ण चित्रपटात एकही संवाद नसून, अगदी शेवटच्या एका दृश्‍यात नायक एक डायलॉग बोलतो. पण चेहऱ्यावरचे हावभाव, अभिनयाच्या जोरावर नायकाने सगळी कसर भरून काढली आहे.

ब्य्रूटल व्हॉयलन्स बरीचशी दृश्‍य अंगावर येणारी आहेत. बॉम्ब फुटल्याने घोड्याच्या चिंधड्या उडतात, पण घोड्यावर बसलेला नायकाला रक्ताने भिजण्यापलीकडे काहीही होत नाही. अशी दृश्‍य लॉजिकवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतात.

पण प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते, तोच पुढे कथा वेगात सरकते. यामुळे लॉजिकचा विचार करण्यास वेळ प्रेक्षकांच्या हाती उरत नाही आणि प्रेक्षक कथेच्या प्लोप्रमाणे वाहवत जातात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कसदार अभिनय, दमदार कथा

ही नायकाप्रमाणेच चपळ आणि वेगवान कथा मोठी जमेची बाजू आहे. ॲक्सल हैनी याने मुख्य खलनायकाची भूमिका निभावली असून, त्याने क्रूर नाझी सैनिक अधिकारी चांगला साकारला आहे.

बाकी मिमासो व्हीलामो, ओनी टॉमिला, जॅक डूलन, टाटू सिनसिलो यांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिका सरस साकारल्या आहेत. दिग्दर्शन जलमारी हेलंडेर याने केले असून, १९४४ च्या महायुद्धाचा काळ हुबेहुब केला आहे.

चित्रपटातही कुठेही व्हीएफएक्सचा वापर केला नसून, सर्व ॲक्शन दृश्‍य लाइव्ह साकारली आहेत. चित्रपटाचे छायाचित्रणही कमाल झाली आहे. बॅकग्राऊंड स्कोअर, तांत्रिक बाजूही लाजवाब आहेत. ॲक्शन, हायव्हॉल्टेज ड्रामा, गोळीबंद कथा, दमदार अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या अपेक्षावर खरा उतरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Pune News: मांढरदेवीच्या यात्रेला अभूतपूर्व गर्दी; भोर मार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, दाेन्ही बाजुला वाहतूक जाम!

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

Rhino Attacks Tiger : वाघाच्या जबड्यातून पिल्लाची सुटका! दुधवा जंगलात गेंड्याच्या मादीचा वाघावर थरारक हल्ला; दुर्मिळ दृश्य video viral!

Black Saree Look: काळ्या साडीतला बॉलिवूड टच देईल तुम्हाला एलिगंट अन् रॉयल लूक, कौतुक नक्की मिळेल!

SCROLL FOR NEXT