water news esakal
नाशिक

Nashik News : पेठ रोडवर ओतले साडेसहा लाखांचे पाणी! नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दुरवस्थेमुळे वादग्रस्त ठरलेल्या पेठ रोड परिसरात रस्ता तयार होत नाही तोपर्यंत नागरिकांना धुळीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तब्बल साडे सहा लाख रुपयांच्या पाण्याची फवारणी करण्यात आली आहे.

नुकतेच महासभेत प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. (Six half lakhs worth of water poured on Peth Road citizens do not suffer from dust Nashik News)

पेठकडून नाशिक शहरात प्रवेश करताना राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील हॉटेल राऊ ते तवली फाटा या दरम्यान जवळपास साडे चार किलोमीटरच्या रस्त्याची चाळण झाली आहे. अवजड वाहनांमुळे साडे चार किलोमीटर रस्ता पार करताना वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी लागतो.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच; शिवाय येथून कायम प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. धुळीमुळे या परिसरातील घरे कुलूपबंद होत आहेत. नागरिकांना दम्याचा त्रास सहन करावा लागतोय.

अशा पार्श्‍वभूमीवर या भागात स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून रस्ता करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी ७२ कोटींचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगून निधी नसल्याचे कारण स्मार्ट सिटी कंपनीने दिले. दरम्यानच्या काळात माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रस्ता तयार होईपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून या भागात धुळीच्या रस्त्यावर रोज दोन टँकर पाण्याची फवारणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. स्मार्ट सिटी कंपनीने नकार दिल्यानंतर महापालिकेने रस्ता दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली. जवळपास एक कोटी ८८ लाख रुपये खर्च करून रस्ता दुरुस्त केला जाणार आहे.

दिवसाला दहा टँकर

महासभेत साडे सहा लाख रुपयांच्या खर्चाला नुकतीच कार्योत्तर मंजुरी घेण्यात आली. २०१२मधील दरानुसार एका टँकरसाठी ५६० रुपये आणि रोज दहा टँकर याप्रमाणे महिन्यातील ३० दिवस असा हिशोब करून एक लाख ९५ हजार रूपये खर्च गृहीत धरण्यात आला. त्यानुसार तीन महिन्यांसाठी ६ लाख ९० हजारांचा निधी खर्च ग्राह्य धरण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार पक्षाच्या 'हायकमांड'ला भेटण्यासाठी दिल्लीला जात आहेत

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT