lungs esakal
नाशिक

फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी घरातल्या घरात फक्त सहा मिनिटे चाला! वैद्यकिय अधिकारी सांगतात..

घरगुती चालण्याची चाचणी करावी, डॉक्टरांचे आवाहन

प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : कोरोनाकाळात फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराची काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता घरगुती चालण्याची चाचणी करावी, असे आवाहन येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश सोनवणे यांनी केले आहे.

आरोग्य विभागाकडून जनजागृती; गरजू रुग्णांना त्वरित उपचार शक्य

ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामास्थांत भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यास सर्वप्रथम फुफ्फुसावर त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे नागरिकांच्या फुफ्फुसाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीबाबत आरोग्य विभागाकडून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात आल्याने गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करणे सहज शक्य होईल. ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच गृहविलगीकरणामध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

अशी करा चाचणी

चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये. मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही, तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी. जेणेकरून काही बदल होतो का, ते लक्षात येईल.

असे आहेत निष्कर्ष

जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती, त्यापेक्षा तीन टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडत आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो, त्यांनी ही चाचणी करू नये. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती सहा मिनिटांऐवजी तीन मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT