Skill Demand Survey participation sakal
नाशिक

Nashik News : विद्यापीठ, उच्चशिक्षण संस्‍थांमध्ये स्‍थापन होणार ‘स्‍कील हब’

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्याच्‍या काळात कौशल्‍यांना महत्त्व प्राप्त झाले असून, नियमित शिक्षणाबरोबर कौशल्‍य विकासावर भर देताना रोजगार, स्‍वयंरोजगार सक्षम विद्यार्थी घडविले जात आहेत. प्रधानमंत्री कौशल विकास योजना ४.० अंतर्गत विद्यापीठ, नामांकित राष्ट्रीय उच्चशिक्षण संस्‍थांमध्ये स्‍कील हब स्‍थापन होईल. या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पुढाकार घेतला आहे.

केंद्र सरकारच्‍या कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागातर्फे प्रधानमंत्री कौशल विकास योजना उपलब्‍ध करून दिलेली आहे. (Skill Hub to be set up in universities higher education institutions nashik news)

या योजनेच्‍या माध्यमातून अल्‍प कालावधीचे कौशल्‍य प्रशिक्षण उपक्रम गेल्‍या २०१५ पासून राबविले जात आहेत. या माध्यमातून उद्योग क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्‍ध करून देण्याचा उद्देश साध्य केला जातो.

शासनाच्‍या माध्यमातून अनुदान उपलब्‍ध करून देताना प्रधानमंत्री कौशल विकास योजना ४.० अवगत करताना योजनेची व्‍याप्ती वाढविण्यात आलेली आहे. या योजनेत ऑन दि जॉब ट्रेनिंगचा पर्याय देताना याबरोबरच शैक्षणिक संस्‍थांच्‍या माध्यमातून कौशल्‍य विकासाचे उपक्रम राबविण्याचे नियोजित आहे.

योजनेच्‍या विस्‍तारीकरणाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कौशल्‍याचे प्रशिक्षण उपलब्‍ध व्‍हावे, या उद्देशाने विद्यापीठ, उच्चशिक्षण देणाऱ्या इन्‍स्‍टिट्यूशनच्‍या पातळीवर स्‍कील हब स्‍थापन करण्याचे प्रस्‍तावित आहे.

प्रशिक्षणक्रम, कौशल्यांची मागणी नोंदवावी लागणार

या योजनेचा लाभ घेऊ इच्‍छिणाऱ्या निमंत्रित संस्‍थांना स्‍कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करण्याच्‍या सूचना ‘यूजीसी’ने परिपत्रकाद्वारे दिल्‍या आहेत. तसेच, संबंधित विद्यापीठ, उच्चशिक्षण संस्‍थांकडून राबविल्‍या जाणाऱ्या संभाव्‍य प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्‍यांची असलेली मागणी आदींसंदर्भातील सविस्‍तर तपशील नमूद करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्‍या पुढाकाराने होत असलेल्‍या या विशेष उपक्रमात निवड झालेल्‍या संस्‍थांनी सहभागी होण्याच्‍या सूचना ‘यूजीसी’ने केल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

SCROLL FOR NEXT