नाशिक : एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना, दुसरीकडे अनलॉकच्या प्रक्रियेमुळे सार्वजनिक ठिकाणांवर गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत गर्दीवर प्रभाविपणे लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ही गोष्ट हेरून भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यातर्फे स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांची स्कॅनिंग केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, जगभरात विशेषतः प्रगत देशांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊ लागला आहे. युएई, अमेरीका, युरोप, चीन, इंडोनेशिया, जपानसह विविध देशांमध्ये नागरिकांची नियमितपणे थर्मल स्कॅनिंग केली जाऊ लागली आहे. भारतातील लोकसंख्या लक्षात घेता, येथेदेखील सार्वजनिक ठिकाणांवर अशा प्रकारे थर्मल स्कॅनिंग होणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ
तासाला बारा हजार तपासणी क्षमता
थर्मल स्कॅनिंगची मोठ्या प्रमाणात गरज हेरून भारतीय जैन संघटनेने स्मार्ट हेल्मेट उपलब्ध करून दिले आहे. याचा वापर मुंबई, पुण्यात सुरूदेखील झाला आहे. तासाला बारा हजार तर दिवसभरात एक लाख लोकांच्या थर्मल स्कॅनिंगची क्षमता असल्याने कोरोना रूग्णांच्या शोधमोहिमेला याद्वारे बळ मिळणार आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्ये हे स्मार्ट हेल्मेट उपलब्ध होणार आहे.
संशयित रूग्णां वेळीच उपचार
नाशिकमध्येही नागरिकांवर याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. या माध्यमातून कोरोना संशयितांचे वेळेत निदान करून त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखतानाच, अशा संशयित रूग्णांनादेखील वेळीच उपचार प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. यापूर्वी नाशिकमध्ये राबविलेल्या मिशन झीरो नाशिक उपक्रमातून हजारो संशयितांना योग्य वेळी उपचार मिळालेले असताना, आता आणखी एक पाऊल पुढे टाकत या मोहिमेला गती मिळणार आहे.
असे आहे तंत्रज्ञान
स्मार्ट हेल्मेटला मध्यभागी कॅमेऱ्यासह विविध सेंसरदेखील बसविण्यात आले आहेत. हेल्मेटवरील कॅमेऱ्याद्वारे समोर येणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र टिपतानाच थर्मल स्कॅनिंग करत शरीराचे तापमान व थर्मल ईमेज वापरकर्त्यांना दाखविली जाते. क्युआर कोड आणि मोबाईल ॲप्लीकेशनलाही स्मार्ट हेल्मेट जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. अतिशय सुलभतेने शरीराचे तापमान मोजता येत असल्याने एका मिनीटात साधारणतः दोनशे, तर तासभरात बारा हजार आणि दिवसभरात सुमारे एक लाख नागरिकांचे सहज स्कॅनिंग करता येऊ शकते.
बाजार समितीत आज शुभारंभ
नाशिकमध्ये स्मार्ट हेल्मेटच्या वापराला शनिवारी (ता. ५) सकाळी दहापासून सुरवात होत आहे. मिशन झीरो नाशिक मोहिमेंतर्गत दिंडोरी रोडवरील बाजार समितीत या हेल्मेटद्वारे गर्दीची थर्मल स्कॅनिंग केली जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी दिली. अन्य गर्दीच्या ठिकाणांवरही हेल्मेटचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संपादन- रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.