smart road.jpg 
नाशिक

नाशिककर 'स्मार्ट सिटी'च्या अजूनही प्रतीक्षेतच!...स्मार्टसिटी प्रकल्प पुन्हा धोक्‍यात

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने 33 टक्के निधीमधूनच कामे करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम स्मार्टसिटी कंपनीसाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीवर होणार आहे. शासनाकडून अनुदान स्वरूपात दिल्या जाणाऱ्या निधीलाही कट बसणार असल्याने यंदा स्मार्टसिटीला या वर्षाचा 50 कोटींचा निधी देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीचे प्रकल्प धोक्‍यात आले आहेत.

राज्य शासनाकडून निधी मिळणार नसल्याचे संकेत 

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्टसिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 50 टक्के, तर राज्य व महापालिकेचा प्रत्येकी 25 टक्के हिस्सा प्रकल्पांसाठी देण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून स्मार्टसिटी कंपनीसाठी 196 कोटी, राज्य शासनाकडून 98 कोटी, तर, महापालिकेकडून 200 कोटींचा निधी देण्यात आला. केंद्राकडून निधी येईल की नाही, याबाबत शाश्‍वती नाही; परंतु राज्य शासनाकडून स्मार्टसिटी प्रकल्पांसाठी निधी मिळणार नसल्याचे संकेत आहेत. 

पाणीपुरवठा प्रकल्प बारगळणार
 
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने 226 कोटींचा अंतिम प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सादर केला होता. निधीला मंजुरी मिळाली असती, तर ग्रामीण व नवनगरांमध्ये पाणीपुरवठ्याच्या सुविधा शक्‍य होत्या. परंतु शासनाकडून निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने तूर्त प्रकल्प बारगळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बससेवेवरून अडचण 

महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 200 सीएनजी, 150 डिझेल व 50 इलेक्‍ट्रिकल बसचे नियोजन करण्यात आले होते. सीएनजी बसची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली. बससेवा सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. ठेकेदाराने बॅंक गॅरन्टी घेतल्याने बससेवा सुरू न केल्यास महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. आर्थिक संकटात बससेवा सुरू केल्यास नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याने महापालिका प्रशासनाची अडचण निर्माण झाली आहे.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT