saving snakes life.jpg 
नाशिक

'तो' अर्धमेल्या अवस्थेत पडलेला!...स्वत:चा श्‍वास देऊन त्याने वाचवला 'त्याचा' जीव...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (दिंडोरी) तालुक्‍यातील परमोरी गावातील शेतकरी अनिल दिघे यांच्या घराशेजारी तो मृत्यूच्या अवस्थेत पडलेला असल्याची घटना घडली. काय करावे, या विचाराने उडाला सगळ्यांचा गोंधळ... पण तो देवदूतासारखा आला अन् वाचविले त्याचे प्राण... नळीद्वारे स्वत:चा श्वास देत त्याने त्याला जीवदान दिले.

अशी आहे घटना

परमोरी शेतकरी अनिल पंडित दिघे यांच्या घराशेजारी शेतात काम करतांना सोमवारी (ता. 9) दुपारी अडीचला पाच फूट लांबीचा नाग आढळला. घाबरून न जाता तत्काळ तालुक्‍यातील आंबे वणीचे सर्पमित्र दीपक धामोडे यांना फोन केला. काही वेळातच त्यांचे सहकारी मित्र हृषीकेश अभिजित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या सापाची पाहणी केली असता तो साप थोडाफार मृत्यूच्या अवस्थेत पडलेला होता. त्याच्या शरीराच्या हालचाली सुरू दिसताच त्यांनी त्याच ठिकाणी उपचार सुरू केले. सर्पमित्र दीपक धामोडे यांनी त्या सापाच्या तोंडात नळी टाकून त्याला स्वत:चा श्‍वास देण्यात प्रयत्न केला असता पाच-दहा मिनिटांनी त्या सापाच्या हालचालींना सुरवात झाली. सापाला सुखरूप पकडून नदीच्या ठिकाणी सुरक्षित सोडून जीवदान मिळाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT