Sneha Padewar esakal
नाशिक

नाशिकच्या स्नेहा पाडेवारची रुपेरी पडद्यावर छाप

अरुण मलानी

नाशिक : नाटक, चित्रपट कलेचा वारसा लाभलेल्या नाशिकमधून राज्‍य व राष्ट्रीय पातळीवर अनेक कलावंत घडले आहेत. ही परंपरा पुढे नेताना सध्या राज्यभरात गाजत असलेल्या ‘हेरवाड पॅटर्न’ या विधवा प्रथेविरोधातील निर्णयाच्या प्रबोधनासाठी तयार केलेल्‍या ‘हेरवाड पॅटर्न’ लघु चित्रपटातून स्‍नेहाने आपल्‍या अभिनयाची छाप सोडली आहे.

लघुटपात स्‍नेहाची भूमिका अत्यंत प्रभावी ठरत असून ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून या लघुपटाचे सार्वजनिक स्क्रीनिंग करून विधवा प्रथेविरोधात जनजागृती केली जाते आहे. तसेच, अनेक ग्रामपंचायती विधवा प्रथा बंदीचा ठराव करत आहेत. स्नेहाने यात सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका साकारत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांनी विधवा प्रथेला केलेला विरोध प्रभावीपणे मांडला आहे.

तिच्या अभिनयातील जिवंतपणा प्रेक्षकांच्या काळजाला भिडत असल्याने लघुपटाची लिंक समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. यातून सामाजिक प्रबोधनाचे मोठे काम होत असल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील रहिवासी असलेले स्नेहा ही सामान्य कुटुंबातील असून म्‍हसरूळ येथील संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेते आहे. यापूर्वी तिने कोरोनाकाळात सेवा देताना कोरोनाने मृत्यू झालेल्या परिचारिकेची कथा ‘मदर्स’ मध्ये काम केले आहे. याशिवाय यातना, साडेग्यारा आदी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर व्ही. सतू व भूषण मंजुळे दिग्दर्शित संविधान तसेच आदिवासी भागातील सामाजिक विषयावरील बिंबन या मराठी चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे स्नेहाच्या रूपाने नाशिकचे नाव महाराष्ट्रभरात पोचणार असल्‍याची प्रतिक्रिया कला क्षेत्रात उमटत आहे.

"विधवा प्रथेविरोधातील ‘हेरवाड पॅटर्न’ मधील भूमिकेने समाजात प्रबोधन होत असल्याने मनाला समाधान वाटते. विधवा प्रथेविरोधात गावोगावी जाऊन ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्याचा मानस आहे. तशी तयारी सुरू आहे."

- स्नेहा पाडेवार, अभिनेत्री, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT