chhagn bhujbal 1.jpg 
नाशिक

समाजाला लाठ्याकाठ्या खाणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची गरज - छगन भुजबळ

दत्ता जाधव

नाशिक : शेतकरी व नागरिकांच्या हिताचे प्रश्‍न सोडविताना प्रसंगी लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना काम करायचे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १७) केले. 

शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत हंसराज वडघुलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे विद्यमान राज्याध्यक्ष हंसराज वडघुले यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. श्री. वडघुले यांच्याबरोबरच चंद्रकांत बच्छाव, राम निकम, शरद लभडे, रतन मटाले, शरद घुगे, नीलेश बिरारे यांनीही पक्षात प्रवेश केला. 

समाजाला लाठ्याकाठ्या खाणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची गरज 
राज्यातील शेतकरी चळवळीत योगदान देण्यासाठी वडघुले यांनी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते स्वर्गीय शरद जोशी व माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काहीकाळ काम केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोट बांधून शेट्टी यांच्या मागे ती उभी करण्यात श्री. वडघुले यांचे मोठे योगदान राहिले. याशिवाय त्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतही संचालक म्हणून काम केले आहे. शेतकरी संघटनेत काम करताना त्यांनी अनेक जिल्हास्तरीय आंदोलनेही यशस्वी केली. 

केवळ शेतकरीहित : वडघुले 
आजवर शेतकरीहितासाठीच काम केले. यापुढेही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सामान्यांच्या प्रश्‍नांसाठी व शेतकरीहितासाठी सहकाऱ्यांसह प्रवेश करत असल्याचे श्री. वडघुले यांनी सांगितले. यापुढे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वाढीसाठी तना-मनाने प्रयत्न करू, असे ते म्हणाले. शेतकरी, नागरिकांच्या हिताचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ आलीतरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची पक्षाला व समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन श्री. भुजबळ यांनी प्रवेशानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT