nashik jawan parashut.png 
नाशिक

VIDEO :...अन् जवानाचे पॅराशूट अडकले बाभळीच्या झाडावर...मग...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  विमानातून पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करताना एका जवानाचे पॅराशूट एका बाभळीच्या झाडावर अडकले आणि एकच तारांबळ उडाली. यावर त्या जवानाला वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

वारा सुटल्याने जवानाचे पॅराशूट भरकटले..अन्...

आज (ता.११) सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.आर्टिलरी सेंटर येथील केंद्रात वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत विमानातून पॅराशूटद्वारे उतरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. असे प्रशिक्षण घेत असलेल्या काही जणांनी आज सकाळी एका विमानातून १३ हजार फुटांवरून उडी मारली. त्यापैकी हनिफ नापा या लष्करी जवानाचे पॅराशूट वारा सुटल्याने भरकटले. यानंतर हनिफ नापा उपनगरातील अमित काठे यांच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडावर अडकले. अमित कोठे यांनी झाडाची फांदी तोडून नापा यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार नाशिक शहरातील शिंगाडा तलाव आणि पंचवटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड तोडले आणि त्या जवानाची सुखरुप सुटका केली. नापा यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

भाबळीचे काटे अंगावर टोचल्याने जवान किरकोळ जखमी

भाबळीचे काटे अंगावर टोचल्याने जवान किरकोळ जखमी झाल्याचे समजते. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले. आणि त्या बाभळीच्या झाडातून जवानाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. दैनंदिन सराव करताना तीन पॅराशूट फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आर्मीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT