virpatni rekha khairnar.jpg 
नाशिक

कारगिल विजय दिवस : वीरपत्‍नी रेखा खैरनार यांचा हक्‍कासाठी लढा सुरूच...सरकारचे आश्वासन कागदावरच  

गायत्री जेऊघाले : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कारगिल युद्धाचा विषय निघाल्‍यावर भारतीय सैन्‍याच्‍या गौरवशाली गाथांचे प्रत्‍येक भारतीयाला स्‍मरण होते. पण १९९९ मधील या कारगिल युद्धात नाशिकचे शहीद जवान एकनाथ खैरनार यांच्‍या कुटुंबीयांचा वीस वर्षांपासून त्‍यांचा हक्‍कासाठी लढा सुरूच आहे. दोन वर्षांपूर्वी तत्‍कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरपत्नींना जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जमिनी शोधून वीर पत्नींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव दिला; पण दोन वर्षे झाल्यानंतरही त्यांची प्रतीक्षा सुरू आहे. 

सरकारचे आश्र्वासन कागदावरच 

रविवारी (ता. २६) कारगिल विजय दिवस. १९९९ ला कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या शहीद एकनाथ खैरनार यांच्या पत्नी रेखा खैरनार यांनी कारगिल दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सकाळ’शी बोलताना त्यांची संघर्ष कहानी एकविली. त्या म्हणाल्या, दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय परीपत्रक काढले होते. त्यानुसार आम्हाला जमिनी शोधून फाइल जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायची होती. आम्ही सर्व वीरपत्नींनी ती फाइल दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे. परंतु अजूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 


पाच महिन्‍यांचा मुलगा 
पाणावल्या डोळ्यांनी आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, लग्नाला केवळ तीन वर्षे झाली होती. पदरी पाच महिन्यांचा मुलगा होता. त्यावेळी फोनवर बोलणे होत नसे. आम्ही पत्रव्यवहार करायचो. मला पतींचे पत्र आले. त्यात त्यांनी २७ मेस घरी येत असल्याचे कळवले. मी त्‍यांच्‍या आगमनाची वाट बघत होते. २७ तारीख आली; परंतु माझे पती आले नाही. एक दिवस जवळच्या पोलिस ठाण्यातील फोन आला आणि पती शहीद झाल्याचे समजले. पती शहीद झाले तेव्हा मुलगा गोवर्धन पाच महिन्यांचा होता. वीरपत्नींना मदत जाहीर केली जाते; परंतु कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होते. 


शूर वीरनारीची स्थापना 
वीर पत्नींच्या समस्या सोडविण्यासाठी शूर वीरनारी या संघटनेची स्थापना केली आहे. वीरपत्नींना अतिशय कमी वयात विधवा व्हावे लागते. त्यांच्या शिकलेल्या मुलांना अनुकंपावर नोकरी मिळाल्यास शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागेल. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत घराची भिंत कोसळल्याने पाचजण जखमी

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT