village at midnight.jpg
village at midnight.jpg 
नाशिक

रात्रीस खेळ चाले! कोणीतरी अज्ञात गावात पशुंच्या जीवावर उठलयं...नागरिक भयभीत..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रात्रीच्या वेळेस संपूर्ण गाव जेव्हा झोपेत असतो. तेव्हा कोणीतरी अज्ञात गावात फिरत असल्याचे समजते..कारण सकाळी उठून जेव्हा पाहतो. तेव्हा बाहेर दावणीला बांधलेले पशू अचानक गायब दिसतात. पण नेमका तो कोण आहे? याचा सुगावा अद्यापही लागलेला नाही.

चिंतेचे व घबराटीचे सावट

अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात पशुधनाचा मृत्यू होत असल्याच्या वाढत्या प्रकाराने नांदगाव तालुक्यातील पशुधन मालकांमध्ये चिंतेचे व घबराटीचे सावट पसरले आहे. पशुधनावर हल्ला करणाऱ्या प्राण्याचा शोध घेऊन त्या प्राण्याला पकडण्याची मागणी नांदगावमधील पशुधन मालक शेतकऱ्यांनी केली आहे.

पाच महिन्यांच्या पारड्यावर अज्ञाताचा हल्ला

गेल्या आठवड्यापासून अज्ञात प्राण्याच्या कारनाम्यांनी नांदगाव तालुक्यातील पिंप्री हवेली, परधाडी येथील पशुधनमालक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात पिंप्री हवेली येथील शेतकरी गोविंद पाटील यांच्या शेतात पाच महिन्यांच्या पारड्यावर अज्ञात प्राण्याने हल्ला केला होता. या घटनेनंतर या आठवड्यात देखील पाटील यांच्या गोठ्यात बांधलेल्या म्हशीवर अज्ञात प्राण्याने हल्ला करून म्हशीला ठार मारले. हा प्राणी बिबट्या असण्याच्या अनामिक भीतीने पिंप्री हवेली परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT