Students receiving treatment at rural hospitals.
Students receiving treatment at rural hospitals. esakal
नाशिक

मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 गंभीर

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : इगतपुरी शहरातील मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातुन किंवा पाण्यातुन विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज बुधवार ( ता.२४ रोजी ) पहाटे पाच वाजेच्या सुमारास झाली असुन यात उलटया होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला आहे.

तर दोन विद्यार्थी अत्यावस्थ असुन त्यांना नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.तसेच चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. (special child Ashram school igatpuri students food poisoning 2 students died nashik Latest marathi news)

या घटनेची माहिती समजताच ग्रामीण रुग्णालयात तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख सदर विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करत असुन एवढी मोठी घटना घडुनही इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप इंगोले व भरारी पथक अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे मात्र गैरहजर असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कारण बधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थां आहे.

या विद्यालयात १२० विद्यार्थी असुन मंगळवारी रात्री खिचडीचे जेवन केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील ८ विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरु झाला. यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला तर दोन विद्यार्थीची प्रकृति चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले असुन चार विद्यार्थ्यांवर येथे उपचार सुरू आहेत.

काल पहाटे पासून विद्यार्थ्यांना त्रास सुरू होता. या घटनेत हर्षल गणेश भोईर, वय २३, रा. भिवंडी, जि. ठाणे व मोहम्मद जुबेर शेख, ११ रा. नाशिक या दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. तर प्रथमेश निलेश बुवा, वय १७ व देवेंद्र कुरुंगे वय १५ वर्ष या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला पाठवण्यात आले आहे.

तर उर्वरित मुलांची तपासणी सुरू केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी खालेल्या अन्नाचे सँपल केले जमा केले असुन या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह पुढील उत्तरीय तपासणी साठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. ग्रामीण रुग्णालयात पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले, पोलीस, निरीक्षक वसंत पथवे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, नायब तहसीलदार प्रविण गुंडाळे, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांच्यासह शहरातील विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेचा आवाज इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला असुन दोषीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT