Traffic Police esakal
नाशिक

Nashik News : नाशिक महिला पोलीसांना मुंबईत वाहतुकीचे धडे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याचे खापर वाहतूक पोलिस शाखेवरच फोडले जाते आहे. नाशिकपेक्षा अधिक पटीने मुंबईत वाहतुकीची समस्या असल्याने तेथील पोलिस कशाप्रकारे वाहतूक नियंत्रित करतात, या उद्देशाने नाशिक वाहतूक शाखेतील ५० महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक १५ दिवसांसाठी मुंबईत वाहतूक नियंत्रण प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले आहे. वाहतूक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना टप्प्याने सदरील प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले. (Special training class for nashik women policemen in Mumbai to solve traffic jams in Nashik news)

नाशिक शहरात वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी शहराच्या ठराविक रस्त्यांवर आणि चौकांवर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या वेळी वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु तरीही सर्वसामान्य वाहनचालक व नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीसाठी वाहतूक पोलिसांना जबाबदार धरले जाते. यासंदर्भात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सदरील समस्या गांभीर्याने घेतली.

आयुक्त नाईकनवरे यांनी अनेक वर्षे मुंबईत कामकाज केलेले असल्याने, नाशिकच्या तुलनेमध्ये कित्येक पटीने मुंबईत वाहनांची संख्या जास्त असून, कोंडीचीही समस्या असते. मात्र मुंबई वाहतूक पोलिस कोंडीची समस्या सोडविण्यासाठी त्यावर कशा रीतीने नियंत्रण मिळवितात, याबाबतची सखोल माहिती नाशिकच्या वाहतूक पोलीसांना व्हावी, यासाठी किमान १५ दिवसांचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आयुक्तांनी मुंबईचे आयुक्त व वाहतूक शाखेशी संपर्क साधून सदर संकल्पना मांडली.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळताच, पहिल्या टप्प्यात नाशिक वाहतूक शाखेचे ५० महिला पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचे एक पथक गेल्या १५ नोव्हेंबरपासून मुंबईला रवाना करण्यात आले आहे. या पथकाचे प्रशिक्षण वर्ग २८ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या दरम्यान, या कर्मचाऱ्यांना मुंबईतील वाहतूक व्यवस्था, वाहतुकीचे नियंत्रण, कोंडी झाल्यास ऑनलाइन वाहनचालकांना वाहतूक कोंडीची सूचना देणे यासह दंडात्मक कारवाई याबाबत सखोल माहिती दिली जात आहे.

"नाशिकच्या तुलनेत मुंबईत वाहनांची संख्या अधिक आणि कोंडीची समस्याही अधिक आहे. तरीही तेथील वाहतूक पोलिस त्यास कशा रीतीने सामोरे जातात आणि वाहतूक नियंत्रित करतात याची माहिती नाशिक वाहतूक शाखेला मिळेल आणि त्याचा लाभ नाशिकची वाहतूक नियंत्रण करण्यावर होऊ शकेल." - जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT