A pipeline leak incident occurred on Friday in an Indian Oil Company project.
A pipeline leak incident occurred on Friday in an Indian Oil Company project. esakal
नाशिक

Nashik News : इंडियन ऑइल कंपनीच्या नागापूर प्रकल्पात गळती; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराजवळ असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या नागापूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर इंधन गळती झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) समोर आली. प्रकल्पात येणारे इंधन अतिदाबाने आल्याने पाइपलाइनला गळती झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अतिसंवेदनशील इंधन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाइपलाइन दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवस लागणार आहे. या घटनेमुळे मराठवाडा, खानदेशसह उत्तर महाराष्ट्रातील इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार यांनी पोलिसांत पत्र देऊन चौकशीची मागणी केली. (Spillage at Indian Oil Company Nagpur Project nashik news)

नागापूर शिवारातील इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पात इंधनसाठा केला जातो. टँकरद्वारे राज्यात विविध ठिकाणी इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर इंधन पुरवठा केला जातो. शुक्रवारी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर इंधन गळती झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

गुरुवारी (ता.१९) मध्यरात्री या प्रकल्पात येणारे इंधन अतिदाबाने आल्याने पाइपलाइनला गळती लागली. ही गळती पहाटे बंद झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही गळती इतक्या मोठ्या प्रमाणावर होती, की अक्षरशः १० ते १५ मीटरपर्यंत उच इंधनाचे फवारे उडाल्याची प्रत्यक्षदर्शीमध्ये चर्चा आहे.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयाचे इंधन वाया गेले. सुरक्षेचे कारण देत कंपनी प्रशासनाकडून कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु या घटनेमुळे अतिसंवेदनशील इंधन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इंधन वाहतूक ठप्प...

इंडियन ऑइलच्या नागापूर प्रकल्पात झालेल्या पाइपलाइन गळतीमुळे शुक्रवारी सकाळपासून या प्रकल्पातून होणारी इंधन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या प्रकल्पातून रोज सुमारे तीनशे ते चारशे टँकर इंधनाचे भरून राज्यातील मराठवाडा, खानदेशसह उत्तर महाराष्ट्रातील इंडियन ऑइलच्या पंपावर पाठवले जातात.

परंतु आज इंधन वाहतूक ठप्प झाल्यामुळे या ठिकाणी इंधन तुटवडा निर्माण होणार आहे. एकही टँकर भरला गेला नसल्याने सर्व इंधन टँकर कंपनीच्या पार्किंगमध्ये उभे आहेत. त्यामुळे या भागांमध्ये कंपनीच्या इतर प्रकल्पांतून इंधन पुरवठा होण्याची शक्यता आहे.

नागापूर सरपंचांचे पोलिसांना निवेदन

सरपंच राजेंद्र पवार यांनी पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पात पेट्रोल-डिझेलच्या पाइपलाइनमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाली आहे. ही गळती कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीमुळे घडली आहे. या घटनेमुळे नागापूर व परिसरात मोठी दुर्घटना घडून आग लागू शकते.

नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची भीती असल्याने कंपनी प्रशासनाने सुरक्षित असल्याचे प्रमाण द्यावे. इतकी मोठी घटना घडूनही या आपत्कालीन माहिती म्हणून मनमाड पोलिस आणि नागापूर ग्रामपंचायतीला देण्यात आलेली नाही. कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी. जबाबदार व्यक्तींवर तत्काळ कारवाई करून पोलिसांत गुन्हा दखल करावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

"इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पात शुक्रवार डिझेल-पेट्रोलच्या पाइपलाइनला गळती लागली या घटनेमुळे नागापूर व परिसर पूर्णतः हादरून गला आहे. व्यवस्थापनाच्या निष्काळजीमुळे ही घटना घडली आहे. याची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला नाही, तर ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत." - राजेंद्र पवार, सरपंच, नागापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 1 जून 2024

Latest Marathi News Live Update: शेटवच्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरूवात

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT