Law Results student tension news esakal
नाशिक

SPPU Law Results : निकालातील घोळामुळे विधीचे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विधी शाखेच्‍या अंतिम वर्षाच्‍या जाहीर केलेल्‍या निकालात घोळ झालेला आहे. त्‍यामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्‍याचा आरोप विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधींनी केला आहे. यासंदर्भात कुलगुरूंच्या नावे निवेदन देत यासंदर्भात दखल घेत आवश्‍यक सुधारणा करण्याची मागणी केली आहे. (SPPU Law Results Many law students fail due to confusion in results Nashik Latest Marathi News)

विद्यार्थ्यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विधी शाखेच्या अंतिम वर्षाचे बरेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, लँड लॉ व कंपनी लॉ चा समावेश आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण (इंटरनल) चांगले असताना, लेखी परीक्षेतील गुणांवरून स्केल डाऊन करून त्यांना नवीन गुण दिलेले आहेत. यामुळेदेखील अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्‍याचा दावा केला आहे.

कंबाईन पासिंगचा नियम लागू असेल असे सांगण्यात आले होते. परंतु जाहीर केलेल्‍या निकालात स्‍केल डाऊन पद्धतीचा वापर झालेला आहे. तांत्रिक त्रृटी दूर करत पुन्‍हा सुधारीत निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठाने दखल न घेतल्‍यास आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्‍याची माहिती ॲड.अजिंक्‍य गिते यांनी दिली आहे. कुलगुरूंच्या नावे दिलेल्‍या निवेदनावर वैभव थोरमिले, शुभांकर बागड, राहुल पाखरे, नीलिमा सोनजे आदी विद्यार्थ्यांच्‍या स्‍वाक्षर्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT