ssc success story All first 5 rank secured by girls yeola nashik news esakal
नाशिक

SSC Success Story : सायकलवर शाळेत, शेतीकामात मदत करीत बाजी! मुलीच ठरल्या अव्वल...

सकाळ वृत्तसेवा

SSC Success Story : अंतरवेली येथून दररोज सायकलवर तीन किलोमीटरवरील सावरगाव विद्यालयात यायचे आणि जायचे...घरी गेले की आईला घर कामाला मदत करायची.

पुन्हा शेतात जाऊन शेती काम करायचे अन उरलेल्या वेळात अभ्यास करायचा...अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आवड जोपासत सोनाली गुंजाळ या विद्यार्थिनीने सावरगाव विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. (ssc success story All first 5 rank secured by girls yeola nashik news)

वर्षभर शेती कामात अन घरकामात मदत करून अभ्यास करत तिने ९४ टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे.

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा सेमी माध्यमाचा निकाल १०० टक्के तर एकत्रित निकाल ९४.६४ टक्के लागला. अतिशय प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत शेतीसाठी मदतीचा हात देतानाच घरची जवाबदारीही निभावत मुलींनी बाजी मारली असून प्रथम पाचही क्रमांक मुलींनीच मिळवले आहेत.

सोसायटीत काम करताना आपल्या मुलीने चांगले शिकावे ही अपेक्षा भीमराव घोडेराव बाळगून होते, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत जिद्दीच्या जोरावर ८९.८० गुण मिळवत श्रद्धा घोडेराव हिने द्वितीय क्रमांक मिळवला. महत्वकांक्षी व शाळेला महत्व देणारी दीपाली तळेकर व निशा गायकवाड या शेतकरी कुटुंबातील मुली अनकुटे येथून सायकलवर पाच किलोमीटरचा प्रवास करून रोज शाळेत यायच्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाळेतून घरी गेले, की पुन्हा आई-वडिलांना शेतीकामात मदतीचा हात देऊन अभ्यास करत दोघींना ८८.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. या मुलींनी संघर्ष करत मिळवलेल्या यशाचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही विद्यालयाचे ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सरचिटणीस प्रमोद पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, युवा नेते संभाजीराजे पवार, माजी सरपंच प्रसाद पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे, नवनियुक्त प्राचार्य मारूती अलगट, पर्यवेक्षक आर. जी. पैठणकर, गजानन नागरे, योगेश भालेराव, उमाकांत आहेर, वसंत विंचू, पोपट भाटे, कैलाश मोरे,

उज्वला तळेकर, ऋषिकेश काटे तसेच यशवंत दराडे, नामदेव पवार, लक्ष्मण माळी, संतोष विंचू, योगेश पवार, रवींद्र दाभाडे, संजय बहिरम, भाग्यश्री सोनवणे, सगुना काळे, सविता पवार, अर्चना भुजबळ, रोहिणी भोरकडे, प्रमोद दाणे, विकास व्यापारे, मयुरेश पैठणकर, रोहित गरुड, नीलेश व्हनमाने, सागर मुंढे, मच्छिंद्र बोडके, लक्ष्मण सांगळे आदी शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT