ST Bus News esakal
नाशिक

Nashik News: हात देऊनही बस थांबेना... चालक वाहकांना ज्येष्ठ नागरिकांचे वावडे

दीपक खैरनार -सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अरे...बस आली चला उठा... पण हात देऊनही बस काही थांबेना...रस्त्यावरील प्रवासासाठी थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे जणू परिवहन मंडळाच्या चालक - वाहकांना वावडेच झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना परिवहन मंडळाच्या बसेस प्रवासात सवलत दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची प्रवासात वाढ झाली आहे. मात्र बहुतांश चालक वाचकांकडून कुचंबणा होत असल्याचा आरोप केला जात आहे. (st bus drivers are not stopping bus for senior citizens nashik news)

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये सवलत देण्यात आली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र शासनाकडून दिलेल्या सवलतीला चालक वाहकांची डोकेदुखी सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे. रस्त्यावर ताटकळत उभे असलेले ज्येष्ठ नागरिकांना घेण्यास चालक व वाहक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

दोन दिवसांपूर्वीच मालेगाव, नामपूर रस्त्यावरील शिवबाण फाट्यानजीक एका वृध्द महिलेने नामपूर जाण्यासाठी मालेगावहुन येणा-या साक्री आगारातील परिवहन मंडळाच्या एका वाहनाला थांबण्यास हाताने इशार केला असता चालकाने दुर्लक्ष करीत बस न थांबता निघून गेल्याचे दिसून आले. दरम्यान बसमध्ये प्रवासी संख्या कमी असूनदेखील बस थांबत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना परिवहन मंडळाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अंबासन गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी मालेगाव व नामपूर येथे शिक्षणासाठी ये-जा करीत असतात.

बहुतांश ठरलेल्या बसेस गावातून न जाता फाट्यावरून निघून जात असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाहक दिड ते दोन किलोमीटर पायपीट करीत फाट्यावरील खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे.

दुपारच्या सत्रात काकडगाव थांब्यावरून थेट अंबासन गावातून साक्री मालेगाव बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. आघार प्रमुखांनी याकडे लक्ष घालून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.

"मी मालेगावहुन बसने प्रवास करीत असताना चालक व वाहकाकडून नामपूर, मालेगाव रस्त्यावरील अंबासन जवळील शिवबाण फाट्यावर बस थांबत नसल्याचे कारण दिले. मी विनंती केली चालक व वाहकाकडून ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा केली जाते." -लोटन हैबत भामरे, ज्येष्ठ नागरिक अंबासन.

चालक, वाहक थांबणार नाहीत असे होणार नाही तरीही अनवधानाने झाले असेल तर पुर्वसुचना देऊन बस थांब्यावर बस थांबवण्यासाठी सुचना देण्यात येतील. -मनिषा देवरे, आगार प्रमुख मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT