st 2.jpg 
नाशिक

येवला, नांदगाव, सटाण्याहून नाशिकपर्यंत धावणार लालपरी

संतोष विंचू

नाशिक/ येवला : सटाणा, नांदगाव, येवला, सिन्नर, पिंपळगाव आदी शहरापासून नाशिक शहरापर्यंत सर्व नियमांचे पालन करून राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती येवला आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली.

सिन्नर व पिंपळगाव बसवंत येथून चार बस नाशिकला 

येवला, नांदगाव, सटाणा, येथून रोज दोन बस, तर सिन्नर व पिंपळगाव बसवंत येथून चार बस नाशिकला चालणार आहेत. लॉकडाउन सुरू असल्याने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे प्रवाशांनाही बंधनकारक राहणार आहे. बसमध्ये ज्येष्ठ नागरिक व १२ वर्षांखालील मुलांना प्रवेश मिळणार नसल्याची माहिती आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली. येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर, पिंपळगाव बसवंत येथून बससेवा सुरू होत असून, सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीतच नागरिकांना बसची सेवा मिळणार आहे.

मालवाहतूक सेवेला अपेक्षित प्रतिसाद नाही

जिल्ह्यातील परिवहन महामंडळाची बससेवा २२ मार्चपासून बंद आहे. बससेवा बंद असल्याने सर्व आगारातील आर्थिक चक्रही थांबले आहे. आर्थिक चक्राला गती देण्यासाठी बसमधून मालवाहतूक सेवाही सुरू करण्यात आली होती. मध्यंतरी दोन तालुक्यांमध्ये बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

नागरिकांना दिलासा
आता चार महिन्यांनंतर सटाणा, नांदगाव, येवला, सिन्नर, पिंपळगाव आदी शहरांपासून नाशिक शहरापर्यंत बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गुरुवार (ता. ६)पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. गुरुवारपासून काही शहरांमध्ये बससेवा सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

रिपोर्ट - संतोष विंचू

संपादन  - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT