corona vaccination Google
नाशिक

नाशिकमध्ये सामान्यांना मागे ठेवून नातेवाईकांना डोस; आरोग्य केंद्रातील प्रकार

दुसऱ्या दाराने ओळखीच्या व व त्यांच्याही नातेवाइकांना डोस देण्याचे काम राजरोस सुरु आहे.

विक्रांत मते

नाशिक : फक्त ४५ वयोगटापुढील व तेही दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींनाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याने काही प्रमाणात लसीकरणाचा (Vaccination) घोळ मिटला. परंतु आता आरोग्य केंद्रांमध्ये बनवाबनवी सुरू झाली आहे. जुने सिडकोतील अचानक चौकातील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत असताना तेथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी मात्र वेगळा फंडा अवलंबला. ज्यांची ओळख नाही अशा सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना नियमांची ढाल बनवून दीड ते दोन तास राखून ठेवले जात आहे. मात्र दुसऱ्या दाराने ओळखीच्या व व त्यांच्याही नातेवाइकांना डोस देण्याचे काम राजरोस सुरु आहे. (Staff and doctors at the vaccination center are giving doses to their relatives before others)

१६ जानेवारीपासून नाशिक शहरामध्ये सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला पंधरा दिवसांपासून ब्रेक लागला आहे. कोरोना लसीकरण करताना सुरवातीला फ्रन्टलाइन वर्कर त्यानंतर ६० वर्ष वयोगटा पुढील व्यक्ती, त्यानंतर ४५ ते ६० वयोगटातील व्यक्ती याप्रमाणे लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. एक मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाची घोषणा केल्यानंतर मात्र लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाला. दुसरा डोस घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना केंद्रांवरून परत जावे लागले. महापालिकेकडे लोकसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात डोस प्राप्त होत असल्याने लसीकरण मोहीम अडखळत सुरू आहे.

कर्मचाऱ्यांची बदलीची मागणी

आता येनकेनप्रकारे १०००० डोस प्राप्त झाल्यानंतर व शासनाने ४५ वयोगटातील पुढील व तेही दुसरा डोस घेण्यास पात्र असलेल्या नागरिकांची लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने आजपासून २९ केंद्रांवर मोहीम सुरळीत सुरू झाली. राज्य शासनाकडून घोळ मिटविण्यात आला खरा, मात्र आरोग्य केंद्रांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरू झाली आहे. शहरातील सर्वच केंद्रांवर कमी-अधिक प्रमाणात लसीकरणाची बनवाबनवी सुरू असून जुने सिडकोतील अचानक चौकातील आरोग्य केंद्राने मात्र कळस गाठल्याने केंद्रातील कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नियमांचा फज्जा

केंद्रामध्ये लस घेण्यासाठी गेल्यानंतर रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. रॅपिड टेस्टसाठी अर्धा तास रांगेत उभे राहिल्यानंतर लसीकरणाच्या नोंदणीसाठी दुसरी रांग लावावी लागते. अर्ध्या तासाचा तो सोपस्कार पार पडल्यानंतर रजिस्ट्रेशन झाले तर ठीक अन्यथा घरचा रस्ता दाखवला जातो. वय नियमात बसत नाही, पहिला डोस घेऊन ४५ दिवस पूर्ण झाले नाही, असे कारण सामान्यांना सांगितले जाते. मात्र दुसरीकडे कुठल्याही नियमांचे बंधन न घातलेल्या ओळखीच्या लोकांना मात्र राजरोस प्रवेश देऊन अवघ्या पाच ते दहा मिनिटात लस देऊन मोकळे केले जाते. लसीकरणाचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरही पुन्हा अर्धा तास थांबावे लागते. या कालावधीमध्ये पुन्हा मागच्या दाराने आलेल्या व्यक्तींना डोस दिले जातात. हा सर्व प्रकार आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या संमतीने होत असून नियम पाळून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मात्र मोठी फरफट होत आहेत.

(Staff and doctors at the vaccination center are giving doses to their relatives before others)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT