kalidas kala mandir 
नाशिक

कालिदास, गायकवाड सभागृहाच्या दरात ५० टक्के घट; स्थायी समितीचा निर्णय 

विक्रांत मते

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृहे, नाट्यगृहे नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली; परंतु ५० टक्के प्रेक्षकांनाच बसण्याची परवानगी असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेनेदेखील कालिदास कलामंदिर नाट्यगृह, दादासाहेब गायकवाड सभागृह व नाशिक रोड येथील महात्मा गांधी टाउनहॉलच्या भाडे दरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आल्याने नाट्यप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय 

मार्चमध्ये देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. गर्दी होणारी ठिकाणे मात्र उशिराने खुली करण्यास परवानगी देण्यात आली. नोव्हेंबरमध्ये सिनेमागृहे, नाट्यगृहे खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; परंतु कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता. प्रेक्षक क्षमता ५० टक्के ठेवण्याची सूचना दिली. सात महिन्यांच्या बंदीमुळे अनेक सिने व नाट्यप्रेमींचा हिरमोड झाला, तर कलावंतांवरदेखील उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना रोजची प्रॅक्टिस करता येत नव्हती. सिने व नाट्यगृहे सुरू करण्यात आली असली, तरी ५० टक्के प्रेक्षकक्षमतेमुळे खर्च भागत नसल्याने आर्थिक तंगी कायम होती. शहरातील नाट्यप्रेमींच्या फ्रेंड्स सर्कल, नाट्यसेवा संस्था, अखिल भारतीय नाट्य परिषद, ऑर्केस्ट्रा असोसिएशन, कल्चरल वेल्फेअर असोसिएशन या संस्थांनी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याची मागणी केली होती त्यानुसार ५० टक्के भाडेकपातीचा निर्णय स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी घेतला.

वर्षभर भाडेदर कमी 

एक वर्षासाठी भाडेदर कमी राहतील. कालिदास कलामंदिरासह भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृह व नाशिक रोड येथील महात्मा गांधी टाउनहॉलचे दरदेखील ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. कालिदास कलामंदिराचे भाडेदर सात हजार रुपयांपर्यंत खाली उतरतील. 
 

नाट्य कलावंत, नाट्य संस्था व नाट्यप्रेमींच्या मागणीनुसार नाट्यगृहाचे दर कमी केले जात आहेत. पुढील एक वर्षासाठी कमी केलेले दर असतील. 
-गणेश गिते, सभापती, स्थायी समिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT