Teacher Recruitment esakal
नाशिक

Nashik News: पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ! पहिल्या टप्प्यात सुमारे 15 हजार शिक्षक भरती प्रक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून सोमवार (ता.२९) पासून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील सुमारे १५ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

याअंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून देण्यास सुरवात झाली आहे. (Start Filling Priority on Holy Portal About 15 thousand teachers recruitment process in first phase Nashik News)

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळा, काही खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत.

पवित्र पोर्टलवर ज्या ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरवात सोमवारी झाली. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ३० जानेवारीची मुदत देण्यात आलेली आहे.

ही मुदत संपुष्टात आल्यानंतर संबंधित जाहिरात प्रसिद्ध होईल. ही मुदत मंगळवारी संपुष्टात येत असून ज्या शाळांची बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतलेली नाही आणि २०२२-२३ मधील संच मान्यता अपूर्ण आहे, त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT