Export grape grower Nilesh Rameshrao Ugle's Nanasaheb Purple Black variety vineyard being pruned esakal
नाशिक

Nashik News: कसबे सुकेणे परिसरात द्राक्ष छाटणीचा ‘श्री गणेशा’! दुष्काळजन्य परिस्थितीमुळे छाटणी वाढणार

सकाळ वृत्तसेवा

कसबे सुकेणे : येथील परिसरात द्राक्ष हंगाम छाटणीचा श्रीगणेशा झाला असून, यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण व संभाव्य दुष्काळजन्य धर्तीवर परिसरात द्राक्ष छाटणीने वेग घेतला आहे.

काळी जातीच्या नानासाहेब पर्पल, जम्बो, मामा जम्बो, फ्लेम, शरद शिडलेस आदी द्राक्षबागा छाटणीस सुरवात झाली आहे. (starting of grape pruning in Kasbe Sukene area Pruning will increase due to drought conditions Nashik News)

मागील वर्षी संततधारेमुळे १० सप्टेंबर नेहमीची छाटणी तारीख उलटली होती. त्यामुळे परिसरात द्राक्ष छाटणीचा श्रीगणेशाच झाला नव्हता. यामुळे परिसरातील द्राक्ष हंगाम सरासरी १५ दिवस ते तीन आठवडे लांबला.

त्याचे दूरगामी परिणाम द्राक्ष उत्पादन व बाजारपेठेवर झाले. एकाच वेळी द्राक्ष छाटणी झाल्यामुळे द्राक्षाचे भाव मोठ्या प्रमाणात पडले व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका व तोटा सहन करावा लागला.

कसबे सुकेणे व परिसराला द्राक्ष बागांचे कॅलिफोर्निया क्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात काळी जातीच्या द्राक्षांसह इतरही जातीचे द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.

शेतजमीन व अनुकूल हवामान असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय देशांतर्गत बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादनाचा पुरवठा केला जातो.

त्यामुळे सर्व सुख दुःख विसरून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्णपणे पाऊस पडत नसल्याने छाटणी सुरवात केली आहे.

त्यामुळे मजुरांनाही काम मिळाले असून, मागील वर्षासारखी द्राक्षाची स्थिती होणार नाही, या दृष्टिकोनातून टप्प्याटप्प्याने द्राक्ष बागा छाटण्यात सुरवात झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वर्षी मजुरीचे भाव जैसे थे असले, तरी द्राक्षासाठी लागणारी रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके व पोषक घटकांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना सुरवातीलाच मोठा खर्च करावा लागणार आहे.

शिवाय या पुढील वातावरण द्राक्ष हंगामासाठी कसे असेल? माघारी मान्सून द्राक्ष हंगामासाठी कसा ठरेल, याची चिंता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत असतानाही सर्व चिंता विसरून आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष छाटणीचा ‘श्री गणेशा’ केला आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून गणेशाला या वर्षी द्राक्ष हंगाम चांगला जाऊ दे, द्राक्ष पिकावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, असे साकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी घालत आहेत.

"मागील वर्षे संततधारेमुळे द्राक्ष बागा छाटण्यास विलंब झाला. शिवाय भाव कोसळल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे द्राक्ष बागा छाटण्या वेळेवर सुरू झाल्या असून, टप्प्याटप्प्याने छाटणी झाल्यास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे."

-रामेश्वर काठे, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, कसबे सुकेणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT