thakre-bobde_.jpg 
नाशिक

नाशिकमध्ये शनिवारी राज्य वकील परिषद...सरन्यायाधीश बोबडे व मुख्यमंत्री यांची उपस्थिती 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवार (ता. 15)पासून ऐतिहासिक दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, धनंजय चंद्रचुड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, परिषदेचा समारोप माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

सरन्यायाधीश शरद बोबडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती 

महाराष्ट्र- गोवा बार असोसिएशन आणि नाशिक वकील संघातर्फे ही पहिली राज्यस्तरीय वकील परिषद होत आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवारी सायंकाळी साडेपाचला न्या. बोबडे यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, भारताचे सॉलिसिटर जनरल ऍड. तुषार मेहता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ऍड. मननकुमार मिश्रा, महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल ऍड. आशुतोष कुंभकोणी, गोव्याचे ऍडव्होकेट जनरल ऍड. देवीदास पंगम प्रमुख पाहुणे असतील. रविवारी (ता.16) सकाळी दहाला प्रथम सत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात, "मार्चिंग टोवर्डस्‌ स्पीडी मॉडर्न ज्युडिशिअरी' याविषयी विचारमंथन होईल. या सत्रात न्या. गवई, मुख्यमंत्री ठाकरे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऍड. एएनएस नाडकर्णी, ऍड. कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ शेखर नाफडे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ऍड. राजेंद्र रघुवंशी सहभागी होणार आहेत. दुपारी दोनला होणाऱ्या सत्रात राज्यातील 26 ज्येष्ठ विधिज्ञांचा गौरव ऍड. मिश्रा, ऍड. कुंभकोणी, ऍड. पंगम यांच्या हस्ते केला जाणार आहे. समारोपाचे सत्र पावणेचारला सुरू होईल. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब, महापौर सतीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे असतील. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. अविनाश भिडे, सदस्य ऍड. जयंत जायभावे, नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष ऍड. प्रकाश आहुजा, सचिव ऍड. जालिंदर ताडगे, ज्येष्ठ विधिज्ञ विलास लोणारी, ऍड. मनीष बस्ते यांच्यासह पदाधिकारी, वकील संयोजन करीत आहेत. 

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

तयारी अंतिम टप्प्यात 
जिल्हा न्यायालयातील अंतर्गत परिसरात डांबरीकरण, न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीस रंगरंगोटी केली आहे. मुख्य सभामंडपासह इतर मंडप उभारण्यात आले आहेत. उपस्थित वकिलांसाठी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांनी खबरदारी घेतली असून, नियमित तपासणी केली जात आहे. तसेच, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने शनिवारी दुपारी दोन ते रात्री दहा आणि रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत सीबीएस ते मेहेर सिग्नल या मार्गावरील दुतर्फा वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Fraud : अंजनगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक; परीक्षा कस्टडी रूमवर आढळला गैरप्रकार, शिक्षण विस्तार अधिकारी फरार

Nagpur Factory Blast : उद्याची स्वप्ने स्फोटाने केली उद्ध्वस्त! नाईट शिफ्टवरून परतताच पत्नी गेल्याची बातमी मिळाली अन्...

Taliban Airstrikes on Pakistan : रावळपिंडी ते क्वेटा, तालिबानने उद्धवस्त केले पाकचे लष्करी तळ, एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर

महेश मांजरेकर पुन्हा रंगमंचावर ! ‘अ‍ॅनिमल’ नाटकातून मांडणार मुंबईतील तरुणांच्या स्वप्नांचा संघर्ष

Holi Stock Market Holiday: होळीला 'या' तारखेला शेअर बाजार बंद राहणार! मार्चमध्ये आणखी किती सुट्ट्या?

SCROLL FOR NEXT