kabbadi esakal
नाशिक

नाशिकमध्ये आजपासून राज्‍य अजिंक्‍यपद स्‍पर्धेला प्रारंभ

अरूण मलाणी

नाशिक : येथील स्‍वर्गीय मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुलाच्‍या सिंथेटिक ट्रॅकवर बुधवार (ता. १६)पासून दोनदिवसीय राज्‍य अजिंक्‍यपद स्‍पर्धा व निवडचाचणी पार पडेल. पतियाळा (पंजाब) येथे जूनअखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्‍पर्धेसाठी राज्‍याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू स्‍पर्धेतून निवडले जातील. कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांमुळे सकाळी सहा ते साडेआठ अशा मर्यादित वेळेत ही स्‍पर्धा पार पडेल. (State-Ajinkyapad-competition-starts-from-today-in-Nashik-marathi-news)

२५ ते २९ जूनदरम्‍यान पतियाळा येथे राष्ट्रीय स्‍पर्धा

पतियाळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्‍पर्धेतून टोकियो ऑलिंपिक स्‍पर्धेकरिता धावपटूंची निवड होणार आहे. त्‍यामुळे नाशिकला होणाऱ्या राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेतून राष्ट्रीय स्‍पर्धेत सहभागी होण्याचा व टोकियो ऑलिं‍पिकचे तिकीट मिळविण्याचा धावपटूंचा प्रयत्‍न असेल. २५ ते २९ जूनदरम्‍यान पतियाळा येथे राष्ट्रीय स्‍पर्धा होणार आहे. या स्‍पर्धेतून ऑलिंपिक पात्रतेकरिता भारतीय खेळाडूंना अंतिम संधी उपलब्‍ध असेल. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशन, केंद्र सरकार व राज्‍य शासनाने नेमून दिलेल्या संपूर्ण नियमांचे स्‍पर्धेदरम्‍यान पालन केले जाणार आहे. या नियमाप्रमाणे निवडचाचणीचे वेळापत्रक आखले आहे. त्‍यानुसार सकाळी सहा ते साडेआठ या वेळेत स्‍पर्धा खेळविल्‍या जातील.

स्पर्धेच्या ठिकाणी आणि संपूर्ण परिसरात सॅनिटायझरची व्यवस्था असेल. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी, संपूर्ण स्पर्धा काळात तेथे असणाऱ्या व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर जोपासले जाणार आहे. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि सचिव सतीश उच्चल यांनी आयोजकांना आणि सर्व सहभागी जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना केल्‍या आहेत. स्पर्धेचे आयोजनप्रमुख आणि नाशिक जिल्हा ॲथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे यांनी याबाबत माहिती दिली. निवडचाचणीचे संयोजन राहुल देशमुख, सचिव सुनील तावरगिरी, विजय पवार, तांत्रिक समितीप्रमुख राजीव जोशी, हेमंत पाटील, प्रशिक्षक विजेंद्रसिंग, नाशिकची ऑलिंपियन खेळाडू तथा अर्जुन पुरस्कारप्राप्त कविता राऊत यांचे सहकार्य लाभत आहे.

स्‍पर्धेचे वेळापत्रक

बुधवारी (ता. १६) पुरुष आणि महिला गटाच्‍या दहा हजार मीटर धावणे, पंधराशे मीटर धावणे, चारशे मीटर धावणे, शंभर मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, तीन हजार मीटर स्टिपल चेस, ट्रिपल जम्प स्‍पर्धा होतील, तर गुरुवारी (ता. १७) पाच हजार मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, लांबउडी, भालाफेक, हातोडाफेक, उंचउडी, ११० मीटर हर्डल्स, चारशे मीटर हर्डल्स आणि आठशे मीटर धावण्याची शर्यत होईल.

नाशिकच्‍या धावपटूंना संधी

स्पर्धेत नाशिककडून कोमल जगदाळे, किसान तडवी, ताई बाम्‍हणे, पूनम सोनुने, रणजित पटेल, दिनेश यादव, हर्षल बच्छाव, आदेश यादव, रोहित यादव आदी खेळाडू सहभागी होत आहेत. या स्‍पर्धेच्‍या माध्यमातून ऑलिंपिकचे तिकीट मिळविण्याची संधी या खेळाडूंना उपलब्‍ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT