Crime  sakal media
नाशिक

नाशिक : सायखेड्यात बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

सायखेडा (जि. नाशिक) : चांदोरी येथे कोट्यवधी रुपयाच्या बनावट दारू कारखाना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी (ता.१२) सायखेडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या कारवाईनंतर काही तासातच राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याच मालकाचा दुसरा कारखाना मिळून येतो, याचे आश्‍चर्यच परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

सायखेडा पोलिस ठाणे हद्दीत चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्याप्रमाणे ग्रामीण पोलिस पथकाने चांदोरी शिवारात सोमवारी (ता.११) रात्री अकरा वाजेच्या सुमारास उदयराजे लॉन्सवर अचानक छापा टाकला.

या ठिकाणी वाहतूक सेनेचा निफाड तालुकाध्यक्ष संजय मल्हारी दाते (वय: ४७, रा. गोंदेगाव ता.निफाड जि. नाशिक) यांच्यासह १२ जण मिळून आले. कारवाईत बनावट देशी दारूचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे १०,००० ते १५,००० देशी दारू रिकाम्या बाटल्या, स्पिरीट अंदाजे २० हजार लिटर, २०० लिटरचे ९० ते १०० बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे ५००० ते १०,०००, देशी दारू बनविण्याचे साहित्य, पाण्याच्या ५ टाक्या व ट्रक असा एकूण अंदाजे एक कोटी पाच लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. सदर देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्स मध्ये सुरू असल्याचे चौकशीत दिसून आले. पंचनामा, मुद्देमाल नोंदीनंतर बारा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच राज्य उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यात दुसरा कारखाना उद्धवस्थ करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान कारवाई झालेल्या दोन्हीही कारखाने हे वाहतूक सेनेचे पदाधिकारी संजय दाते यांचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सायखेडा पोलिस ठाणे हद्दीत दोन दिवसापूर्वीच साडेसहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर चांदोरी व सायखेडा येथे बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा प्रश्‍न चर्चेत आला आहे.

सात संशयितांना पोलिस कोठडी

चांदोरी येथील कारवाईत बारा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात काही विधी संघर्षग्रस्तांचा समावेश होता. जागेचे मालक अंबादास खरात (रा.चांदोरी), मुख्य संशयित संजय दाते, शुभम शिंदे, सुरेश देवरे (दोघे रा. शिरूड जि.धुळे), दीपक पाटील (देवपूर), पंकजकुमार मंडल व मनिकांत मंडल (दोघे. रा.बिहार) यांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सातही संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT