नाशिक : देशभरात कोठेही टायरबेस मेट्रोचा प्रकल्प झाला नसताना निवडणुकीच्या तोंडावर नाशिक दत्तक घेतलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायरबेस मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली. त्यानंतर निवडणुका होऊन राज्यात सत्तांतरदेखील घडले. परंतु अद्याप कोठेही नाशिक मेट्रोचा उल्लेख न झाल्याने निवडणुकीपुरते गाजर समजले गेले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाशिकचा मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती केली आहे.
महापालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परतु ते मुख्यमंत्री असेपर्यंत ठोस काम झाले नाही. अद्यापही ठोस असे काम होत नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिककरांसमोर जायचे असेल तर त्यासाठी मोठा प्रकल्प दाखवावा लागेल. या उद्देशाने नाशिकमध्ये देशातील पहिला टायरबेस मेट्रो प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.
हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ
नाशिकला मेट्रो येणार म्हणून..
एकूण ३२ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी नाशिक निओ कंपनीची स्थापनाही करण्यात आली होती. २ हजार १६० कोटींच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जपानच्या कंपनीकडून बाराशे कोटींचे अर्थसहाय्य मिळविण्याची तयारी दाखविण्यात आली होती. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने उभारली जाणार होती. ३२ किलोमीटर लांबीच्या मार्गावर दोन कॅरिडॉर, २९ स्थानके असे नियोजन होते. चार वर्षात प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे त्यावेळी श्री. फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले होते. भाजपने निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनविला होता. नाशिकला मेट्रो येणार म्हणून भाजपला पुन्हा भरभरून मतदान झाले. मात्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर या प्रकल्पाकडे कोणी लक्ष दिले नाही. मेट्रोचा म देखील उच्चारला गेला नाही. आता ठाकरे सरकारने केंद्र सरकारकडे पत्र पाठवत टायरबेस मेट्रोला चालना देण्याची विनंती केली आहे.
खिजविण्याचा प्रकार?
वर्षभरापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी टायरबेस मेट्रोचा विषय प्रचाराचा झाला होता. त्यानंतर मात्र एकदाही विषय निघाला नाही. टायरबेस मेट्रो हा नवीन विषय असल्याने अंमलबजावणी बाबत संशय व्यक्त होत होता. त्यामुळे जसे दिवस गेले तसे नागरिक देखील हा विषय विसरले. २७ ऑगष्टला राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भुषण गगरानी यांनी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पत्र पाठवून प्रकल्पाला चालना देण्याची विनंती केल्याने निवडणुक प्रचारात मुद्दा बनविलेल्या भाजपला खिजविण्याचा प्रकार तर नाही ना अशी चर्चा आता सुरु झाली आहे. श्री. गगरानी यांनी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने काढलेल्या त्रुटींची पुर्तता केल्याने नाशिक टायरबेस मेट्रोला मान्यता देण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.