Covishild Vaccine Missing esakal
नाशिक

Nashik News : शहरातून Covishield गायब; मागणी करूनही शासनाकडून अदखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला असताना देशभरातदेखील आरोग्य सेवा हाय अलर्ट मोडवर आली आहे. असे असताना मात्र नाशिकमध्ये कोविशील्ड लसीचा खडखडाट असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडे मागणी करूनही लस पुरवली जात नसल्याने महापालिकेला कोव्हॅक्सिन वरच समाधान मानावे लागत आहे.

मागील दोन वर्षात जवळपास पावणेतीन लाख लोकांना घेरत कोरोनाने जवळपास साडेचार हजार लोकांना मृत्यूच्या कवेत ढकलले. मार्च महिन्यापासून कोरोनाचा आलेख घटत सध्या शून्यावर आला आहे. अशा परिस्थितीमध्ये नाशिक शहर व जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाल्याचे समजून नियमित व्यवहार सुरू आहे. (State government ignorance towards covishield vaccine Stock out Nashik NMC News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

परंतु, ज्या देशातून कोरोना व्हायरसचा प्रसार झाला. त्याच चीनमध्ये कोरोनाने सध्या हाहाकार उडविला आहे. चीनच्या परिस्थितीमुळे देशातील आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आली आहे. कोरोना संसर्गाला प्रतिरोध करणाऱ्या लसीकरण मोहिमेने पुन्हा जोर पकडला आहे.

मात्र, असे असताना नाशिक शहरात कोविशील्डच्या कुप्या मात्र शून्यावर आल्या आहे. वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. परिणामी लसीकरण थांबले आहे. कोव्हॅक्सिन मात्र उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

कोवीशील्डचे २२ लाख डोस

महापालिकेकडून आत्तापर्यंत कोविशील्डचे २१ लाख ८० हजार ९०५ डोस देण्यात आले आहे. यात पहिला दुसरा व तिसरा या तिन्ही डोसचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनचे तीन लाख ९१ हजार २४९ देण्यात आले आहेत. स्पुतिनिकचे ११ हजार ८५७ डोस देण्यात आले. १८ ते ४४ वयोगटात आत्तापर्यंत ८९ टक्के नागरिकांनी पहिला तर ७६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला बूस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे नऊ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update : प्रादेशिक मनोरुग्णालयात स्वच्छता कंत्राटावरून वाद, संस्थेला नोटीस

SCROLL FOR NEXT