In the state for RTE admission 4,046 applications on the first day Nashik Marathi News 
नाशिक

आरटीई प्रवेशासाठी पहिल्‍याच दिवशी ४,०४६ अर्ज; पुण्यानंतर नाशिकमधून सर्वाधिक अर्ज

अरुण मलाणी

नाशिक  : शिक्षणाचा हक्‍क (आरटीई) कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास वर्गातील घटकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी (ता. ३) पहिल्‍याच दिवशी राज्‍यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळी साडेसातपर्यंत चार हजार ४६ अर्ज दाखल झाले होते. यापैकी सर्वाधिक ९९५ अर्ज पुणे जिल्ह्यातून व त्‍यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून ८१७ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. 

आरटीईअंतर्गत राखीव २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशासाठी इच्‍छुक व पात्र पालकांना त्‍यांच्‍या पाल्‍याच्‍या नावाने येत्‍या २१ मार्चपर्यंत ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज भरता येणार आहे. संकेतस्‍थळ व ॲपद्वारे अर्ज भरण्याची सुविधा आहे. या प्रक्रियेच्‍या पहिल्‍याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्‍यान, प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शाळांच्‍या नोंदणीची प्रक्रिया पार पडली होती. यात राज्‍यभरातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी केली असून, ९६ हजार ६२९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध केल्‍या आहेत. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा राज्‍य व जिल्‍हास्‍तरावर उपलब्‍ध जागांची संख्या घटलेली असताना, प्रवेशासाठी इच्‍छुक पालकांमध्ये उत्‍साह बघायला मिळतो आहे. प्रक्रियेच्‍या पहिल्‍याच दिवशी सायंकाळी साडेसातपर्यंत चार हजार ४६ अर्ज दाखल झाले होते. 

दाखल अर्जांची स्‍थिती : 

पहिल्‍या दिवशी राज्‍यात सर्वाधिक ९९५ अर्ज पुणे जिल्ह्यात भरले गेले. त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ८१७ अर्ज भरले आहेत. जळगावला १०२, नागपूर- ३७९, मुंबई- २००, ठाणे- २९०, औरंगाबाद- १५४, रायगड- २०३ अर्ज दाखल झालेले आहेत. 

शहरात १,५४६ जागा 

पुढील शैक्षणिक वर्षासाठी शहरातील ९१ शाळांमध्ये एक हजार ५४६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. पालकांनी शासनाच्या नियमावलीनुसार प्रवेशप्रक्रियेला सामोरे जावे, तसेच अर्जात पत्ता व स्वत:च्या घराचे गुगल लोकेशन टाकावे, शाळा व घराच्या अंतराची मर्यादा लक्षात घेऊन शाळेची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने दोन मदत केंद्रे सुरू केली आहेत. प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला या कागदपत्रांची आवश्‍यकता राहणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT