neela.jpg 
नाशिक

पुष्पावतीच्या विद्यार्थीनी ते राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त...नीला सत्यनारायण यांच्या स्मृतींना नाशकात उजाळा !

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे गुरुवारी (ता.16) मुंबईत कोरोनामुळे निधन झाले. त्या नाशिकच्या पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी होत्या. नीला सत्यनारायण यांच्या स्मृतींना आज संस्थेत उजाळा देण्यात आला. 

नीला सत्यनारायण यांच्या स्मृतींना नाशकात उजाळा

राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त राहिलेल्या नीला सत्यनारायण यांचे आज गुरुवारी (ता.16) मुंबईत निधन झाले. त्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पावती रुंगटा कन्या विदयालयात शिकत असतांनाच त्यांच्या वडीलांची बदली झाल्याने नाशिक सोडावे लागले. परंतु तरीही पहिली ते पाचवी असे शिक्षण त्यांनी याच संस्थेत शिक्षण घेतले. आठ वर्षापुर्वी शाळेला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळाही दिला होता. नी
ला सत्यनारायण यांनी १९५९ मध्ये इयत्ता ५ वीला पुष्पावती रुंगटा कन्या विदयालयात प्रवेश घेतला होता. तत्पूर्वी त्यांचे इयत्ता ४ थीपर्यंतचे शिक्षणही संस्थेच्या मोहिनीदेवी रूंगटा बाल मंदिरात झाले होते. निवडणुक आयुक्तपदी सतांना आठ वर्षापूर्वी नीला सत्यनारायण यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक येथील पुष्पावती रुंगटा कन्या विदयालयाला भेट दिली. त्यावेळी प्रथम शाळेच्या मैदानापासुन शाळेची इमारतीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. एवढेच नव्हे तर त्यांनी ज्या वर्गात शिक्षण घेतले त्या वर्गातील बेंचलाही भेट दिली. 

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

शाळेच्या कार्यालयात संस्थेचे पदाधिकारी, शालेय पदाधिकारी व शिक्षकांशी चर्चा केली यानंतर विदयार्थीनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ४८ ते ४९ वर्षानंतर संस्थेची प्रार्थना 'हे परमत्मन जगणं निवास' तोंडपाठ होती. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा ती सादर केली. यावेळी त्यांनी त्यांच्या काळातील शिक्षक व शाळेची माहिती सांगुन शालेय जीवनातील आठवणींना उजाळाही दिला. संस्थेच्या वतीने आयोजित कै. रं. कृ. यार्दी व्याख्यानमालेत प. सा. नाटयगृह येथे प्रशासकीय कार्यात महिलांचे योगदानावर पुष्प गुंफले होते. या व्याख्यानमालेला नाशिकरांनी मोठया प्रमाणात गर्दी केल्याच्या स्मृतीही जागविण्यात आल्या. 

संस्थेकडून आदरांजली... 

राज्याच्या पहिल्या महिला माजी निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशकातील अशोकस्तंभ येथील पुष्पावती रुंगटा कन्या विदयालयाच्या माजी विद्यार्थीनी होत्या. संस्थेला त्यांचा अभिमान होता. त्यांनी प्रशासकीय सेवेत राज्यात उल्लेखनीय कार्य केले होते या शब्दात संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला यांनी आदरांजली अर्पण केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT