arrest esakal
नाशिक

मौजमजेसाठी करायचे दुचाक्यांची चोरी; चौघे गजाआड

पोलिस चौकशीतून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करतानाच केवळ मौजमजेसाठी चौघांनी दुचाकी चोरून त्या परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. संशयितांकडून चोरीच्या सुमारे ६ लाख रुपये किमतीच्या १४ दुचाक्या जप्त केल्या आहेत. पोलिस चौकशीतून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

अमोल दशरथ पाटील (२३), विशाल अधिकार पाटील (२२, दोघे मूळ रा. मु. पो. मांडळ, ता. अंमळनेर, जि. जळगाव), दिनेश सुनील पाटील (रा. आनोरी, पो. जवखेडा, ता. अंमळनेर, जि. जळगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (२२, रा. सबगव्हाण, ता. अंमळनेर, जि. जळगाव) अशी चोरट्यांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेले संशयित चौघेही नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपनीमध्ये नोकरीला होते. मात्र, केवळ मौजमजेसाठी ते दुचाकी चोरी करू लागले. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दुचाकी चोरीचा छडा लावताना त्यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले. त्यावरून पथकाने माग काढत संशयित हे मूळचे अंमळनेर येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार संशयित दुचाकी अंमळनेर परिसरात विक्री करीत असल्याचे समोर आले.

पथकाने अमळनेरला जाऊन संशयित अमोल व विशाल या दोघांना अटक केली. पोलिस चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ६ लाख रुपयांच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, सातपूर हद्दीतील सहा, अंमळनेर परिसरातील दोन यासह अन्य ठिकाणाहून चार अशा गुन्ह्यांची उकल झाली. चौकशीतून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आयुक्त नाईकनवरे यांनी व्यक्त केली आहे.

सदरील कामगिरी आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक विष्णू उगले, रवींद्र बागूल, येवाजी महाले, आसिफ तांबोळी, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अण्णासाहेब गुंजाळ आदींनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT