Kanbai decoration at Tushar Mahale's house in Uttamnagar on Sunday. esakal
नाशिक

कानबाई चालनी गंगेवरी, साखर पेरत चालनी माय

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : ‘कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी’, ‘साखर पेरत चालनी व माय साखर पेरत चालनी’, ‘कानबाई बसली चौरंगवरी व माय, बैसली चौरंगवरी’, ‘हिरवी पैठणी नेसली व माय पैठणी नेसली’, ‘हिरव्या बांगड्या हाती व माय बांगड्या हाती’, या आणि अशा विविध अहिराणी गीतांच्या गजरात सिडकोमध्ये रविवारी (ता. ७) खानदेशातील अनेक कुटुंबियांनी भक्तिभावाने कानबाईची प्रतिष्ठापना केली.

सोमवारी (ता. ८) सकाळी नऊला उत्तमनगर बस स्टॉप येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, दुपारी तीनला उंटवाडीत कानबाईचे विसर्जन करण्यात येणार आहे. (sthapna of Kanbai with devotion Immersion procession today nashik Latest Marathi News)

श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी खानदेशात कानबाईची स्थापना केली जाते. यानिमित्त ज्या घरी स्थापना होते, त्या घरी सर्व नातलग आणि आप्तेष्ट जमा होतात. परंपरेनुसार कानबाईला पुरणपोळीचा नैवेद्य वाढण्यात आला.

अहिराणी भाषेत असलेल्या कानबाईच्या गीतांनी वातावरण भक्तिमय झाले. कोरोनामुळे बरेच नातेवाईक व गावकरी एकमेकांना भेटू शकले नव्हते. यंदा मात्र ही संधी मिळाल्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी खानदेशी कुटुंबीय सज्ज झाले आहेत. गेल्या १४ वर्षांपासून हा उत्सव सिडकोमध्ये साजरा केला जातो.

कानबाई माता उत्सव समिती या मिरवणुकीचे संयोजन करीत आहे. जगताप मळ्यातील विहिरीत दुपारी तीनला कानबाई मातेचे विसर्जन करण्यात येईल. या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन रवी पाटील, नितीन माळी, यशवंत नेरकर, भगवान पाटील, सुरेश सोनवणे, रवींद्र पाटील, वसंत चौधरी, सुनील भारोटे आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT