Stone-Crusher reference image esakal
नाशिक

Nashik News : गणेशनगर येथील खडीक्रेशर सील; विनापरवाना उत्खननावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या खडीक्रेशरचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काही ठिकाणी कठोर तर काही ठिकाणी सोयीने कारवाई करताना दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्ह्यातील गणेशनगर येथे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या खडी क्रेशरवर जिल्हा प्रशासनाच्या नाशिकच्या पथकाने कारवाई करीत सील केले. या खडी क्रेशरचा वीजपुरवठाही खंडित केला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे पुन्हा अवैधरित्या असलेल्या खडीक्रेशर चालकांचे धाबे दणाणले आहे. (Stone crusher seal at Ganeshnagar District Administration Action on Unlicensed Mining Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्याकडे गणेशनगरमध्ये अवैधरित्या खडी क्रेशर सुरू असल्याची तक्रार आली होती. या तक्रारीबाबत शहानिशा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गौणखनिज विभगाच्या पथकाला जागेवर जाऊन कारवाई करण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार पथकाने बुधवारी (ता. १४) गणेशनगर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या खडी क्रेशरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पथकाने सदरील खडी क्रेशर सील केले आहे. क्रेशरसाठी असलेला वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या पथकाकडून गुरुवारीही (ता. १५) उत्खनन करण्यात आलेल्या जागेची पाहाणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून याठिकाणी अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भातील सविस्तर माहिती संकलित केली जात आहे. पथकाच्या अहवालानुसार, खडी क्रेशर चालकाविरोधात कारवाई केली जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

"गणेशनगर येथील खडीक्रशर चालकाकडे उत्खननाबाबतच्या कोणत्याही परवानगी नसल्याचे समोर आले आहे. मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष क्रशर सील केले. पथकाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल."

- रोहिणी चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT