A street lamp running during the day in Prerna Colony area here.  esakal
नाशिक

Nashik News : मालेगावात 6 महिन्यांपासून रात्रंदिवस पथदीप सुरू; नागरिकांत संताप

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात महापालिकेचे असंख्य पथदीप हे दिवस-रात्र सुरू राहतात. हे प्रकार वारंवार घडत आहेत. येथील कॅम्प भागातील डॉ. वाव्हाळ हॉस्पिटलनजीक असलेल्या प्रेरणा कॉलनी भागात महापालिकेचे चार पथदीप आहेत. (street lights have been running day and night in Malegaon for 6 months nashik news)

चारही पथदीप गेल्या सहा महिन्यांपासून दिवस-रात्र सुरू आहेत. महापालिकेचे वीजबिल वाढत आहे. नागरिकांच्या करातून मिळणाऱ्या पैशांनी हे वीजबील भरले जाते. बेफिकिरी वृत्तीमुळे महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

एकीकडे राज्यात ‘वीज वाचवा’ असा संदेश दिला जातो, तर दुसरीकडे पथदीप दिवसरात्र सुरू आहेत. शहरात महापालिकेला पथदीपांचे महिन्याला सुमारे चाळीस लाख रुपये बिल येते. येथील प्रेरणा कॉलनी भागात चार पथदीप दिवसाही सुरू राहतात. वारंवार परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार देऊनही लक्ष दिले जात नाही.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

येथील पथदीपांमुळे रोज विजेचे बील वाढते. हा प्रकार शहरातील विविध भागात सुरू आहे. सावतानगरमधील सच्चाई किराणा दुकानासमोरील पथदीपही रात्रंदिवस सुरू राहतो. दिवसा सुरू असलेल्या पथदीपांबाबत जागरुक नागरिकांनी तक्रार केल्यास टेस्टिंग सुरू आहे, असे गुळगुळीत उत्तर देऊन वेळ निभाऊन नेली जाते. दिवसा सुरू असलेले पथदीप बंद करावेत. तसेच शहरात बंद असलेले पथदीप दुरुस्त करून सुरू करावेत, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT