Strict action against those who do not follow discipline says nashik mayor marathi news 
नाशिक

बेशिस्तांवर कठोर कारवाईच! आरोग्य, वैद्यकीय विभागाच्या बैठकीत महापौरांची स्पष्टोक्ती

विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी नागरिकांनीही नियम पाळून प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे सर्वांचे कर्तव्य आहे. नियम पाळले जात नसतील तर, कठोर कारवाई होणारच, अशी स्पष्टोक्ती महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. 

रामायण येथे आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या अधिकार्यांची बैठक शुक्रवारी (ता. १८) झाली. त्या वेळी मास्क, सॅनिटायझेशन, हॅन्डग्लोज घालणे आदींबाबत माहिती देण्यात आली. मंगळवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत नगरसेवकांच्या तक्रारीवरून मास्क न घालणार्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कोरोना काळात अर्थचक्र बिघडल्याने नागरिकांना दंड परवडणार नाही, दंड करण्यामागे शिस्त लावणे हाच हेतू असल्याने दंडाची रक्कम कमी करून दोनशे रुपयांपर्यंत आणण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला. त्यापार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी बैठक घेतली. महापालिकेतर्फे कोरोनाबाबत बाजारपेठांमध्ये जनजागृती करून मास्कचा वापर करण्याची सक्ती करण्याच्या सूचना दिल्या.

मास्कचा वापर करावा याबाबत जनजागृती

शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची दिवसेंदिवस होणारी गर्दी त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्कचा वापर करणे व सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सहा विभागात स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करून या वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून त्याद्वारे सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, याबाबत जनजागृती करून मास्क वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेसाठी पोलिसांची मदत देण्याच्या दृष्टीने नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, डॉ. राजेंद्र त्र्यंबके, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, एल. ए. गायकवाड, जयश्री सोनवणे, मयूर पाटील, नीलेश साळी आदी उपस्थित होते. 


कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून काम करीत असताना प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची दक्षता घेऊन विभाग सुरक्षित ठेवावा कोरोनाच्या लढाईत लोकप्रतिनिधी प्रशासनासोबत आहे. 
- सतीश कुलकर्णी, महापौर, महापालिका. 
 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT