A baby in tattered clothes at a sugar cane cutting site. Little boy and dad eating next door. esakal
नाशिक

Nashik News : ऊसतोड महिलांची व्यथा; थंडीतही कोयता ऊसतोडणीच्या कामाला

थंडीत पहाटे चारला उठावे लागते. स्वयंपाक करून नवऱ्यासोबत उसाच्या फडात जायचं. दिवसभर ऊस तोडायचा.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : थंडीत पहाटे चारला उठावे लागते. स्वयंपाक करून नवऱ्यासोबत उसाच्या फडात जायचं. दिवसभर ऊस तोडायचा. त्याच्या मोळ्या बांधायच्या आणि रात्री कडाक्याच्या थंडीत वाहने भरून द्यायची, पण एवढं करूनही रस्त्यावरून जाताना उसाने भरलेली वाहने रस्त्यावर उलटतात.

तेव्हा ऊसतोडणी मजुरांचा संघर्ष जीवनाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो, असे ऊसतोड करणारी महिला सांगत होती.(struggle of sugarcane labourers reached pinnacle of life nashik news)

उसाच्या फडात कोप्या उभारलेल्या असतात. कोप्या म्हणजेच त्यांचे घर. त्याच घरातून सहा महिने त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. सगळ्यांत जास्त त्यांच्या लहान मुलांची फरपट होते. कारण दिवसाला एक ट्रॅक्टर-ट्रक ऊस तोडल्याशिवाय पर्याय नसतो. ट्रॅक्टर-ट्रक दिवसा व रात्री अपरात्री आले, तरी भरून द्यावे लागते.

त्यामुळे पोटच्या गोळ्याला पाचटावर टाकत वाहन भरायला जावे लागते. आपल्या अर्धनग्न चिमुरड्यांना कुशीत घेऊन त्यांना मायेची ऊब देण्याचे भाग्य क्वचितच त्यांना लाभते. संसाराची धुरा सांभाळत, ऊसतोड करणाऱ्या महिला उसाचे ट्रक, ट्रॉली रिचवून आपली उंची दाखवून देतात. त्यांच्या दुःखावर फुंकर मारायला कुणीही तयार होत नाही.

शेकडो किलोमीटरवरून आपला तुटपुंजा संसार घेऊन आलेली ही कुटुंबे ऊसतोड करून जगतात. कधी कधी अनेक धोक्यांचा सामना करत आपल्या प्राणाला मुकतातही. ऊसतोडणी महिला मजुरांच्या व्यथांचा थोडा तरी माणुसकीच्या नात्याने सर्वच स्तरातून विचार होणे गरजेचे आहे.

गरोदरमाता ऊस तोडणीवर असतानाच प्रसूती होते. रुग्णालये व इतर सुविधांविना नवजात बालकांना त्याच ठिकाणी जमिनीच्या पोटात घालणं मनाला हेलावून टाकते. सहा महिने गावाकडे आणि सहा महिने परजिल्ह्यात जाण्याने साऱ्या संसाराची फरफट होते.

परिवाराचे नियोजन कोलमडते. त्यांच्या वयोवृद्ध आईवडिलांना एकटेच सोडून जावे लागते. ना पाणी, ना वीज, ना अन्य जीवनावश्यक सुविधा. काबाडकष्ट करून मुलांना दोन वेळचं जेवण पुरविण्याचीही कमाई कधी कधी त्यांना उपाशी ठेवते. अशा स्थितीत त्यांच्या बालकांना शिक्षण काय मिळणार?

मुलांची अवस्था दयनीय

चिमुकल्या बाळाचा निवाराही फडातच असतो. ऊसतोड महिला आपल्या कामात मग्न असते. चिमुकल्याचे रडणे ऐकताच भूक लागल्याची जाणीव निर्माण होते. उसाच्या फडातच एखाद्या फाटक्या चिंधीचा पाळणा करून बाळाला तेथे पाजले जाते. सहा महिने त्यांचे शिक्षणाविना वाया जातात. परिणामी, या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्याची भाषा केली जात असताना, मजुरांना आपल्या पाल्याच्या भवितव्याच्या स्वप्नाकडे केवळ पाहत राहावे लागते.

उचलीच्या कपातीने जगणे कठीण

ऊस तोडणीसाठी कारखान्यावर जाण्यापूर्वी या जोडप्यांना मुकादम, वाहतूकदार किमान एक लाख रुपयांपर्यंत उचल देतात. मजुराला दिवसाकाठी ५०० ते ५५० रुपये पगार मिळतो. महिना १५००० रुपये. त्यातून उचल कामगारांकडून महिन्याला पगारातून मुकादम कपात करून घेतो. यामुळे अत्यंत किरकोळ रक्कम उरते. त्यामधून त्यांचे जगणे होत नाही. त्या मजुरांना गावाकडे आई-वडिलांना ठेवून कारखान्यावर जावे लागते.

''आमचा भाग दुष्काळी असल्याने शेतीत फारशी पिकत नाही. उदरनिर्वाहासाठी ऊसतोड करावी लागते. आमचा संसार उघड्यावर मांडावा लागतो.''-सुनीता त्र्यंबक पवार, सोनगाव (ता. मालेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT