Pupils with extra food bananas at Zilla Parishad Primary School here.
Pupils with extra food bananas at Zilla Parishad Primary School here. esakal
नाशिक

SAKAL Special : पुरक आहाराला महागाईच्या झळा अन् 'केळी' साठी नानाकळा!

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेत विद्यार्थ्यांना दर बुधवारी पूरक आहार दिला जातो.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून दर बुधवारी प्रत्येक विद्यार्थ्याला एक 'केळी' देण्याचा निर्णय शालेय प्रशासनाने घेतला आहे. (students School Nutrition Scheme banana inflation problem to schools nashik news)

या निर्णयानुसार सर्वच शाळांमध्ये बुधवारी केळी वाटप सुरू आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय आहारांतर्गत केळी वाटप केली जाते दरम्यान थंडीत पौष्टिक असलेली केळी सुरवातीला परवडली.

आता मात्र या केळीला महागाईच्या झळा बसू लागल्या परिणामी अल्प मोबदल्यात महागडापूरक आहार गुरुजींना आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. त्यातच बुधवारी प्रत्येक शाळेला केळी लागतात त्यामुळे व्यापारी वर्गाने प्रचंड भाववाढ केली.

नियोजनबद्ध असणाऱ्या गुरुजनांना आदल्या दिवशी बाजारात केळीसाठी धावाधाव करावी लागते. केळीचा तुटवडा असल्याने मुलांना देण्यासाठी केळी आणायच्या कुठून ? असा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे.

दरम्यान, बुधवारी केळी उपलब्ध झाली नाही तर गुरुवारी दिली तरी चालेल, अशीही सकारात्मक भूमिका प्रशासनाने घेतली असली तरी अडचण उपलब्ध होण्याची असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या केळीला भाव नसतो इकडे महागडी केळी त्यातही नैसर्गिक पिकलेली नसल्याने कृत्रिमरीत्या पिवळी धमक दिसणारी केळी पदरमोड करून आणावी लागते. शाळांसाठी सवलतीच्या दरात व्यापारी केळी कशी देणार हा यक्षप्रश्न आहे.

दरम्यान 'नाचणी' तळलेले पापड त्याऐवजी देण्यात यावेत मात्र पुन्हा तीच चणचण भासणार हे चित्र सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे.

आहारासाठी शासनाचे दर

पहिली ते पाचवीच्या वर्गातील लाभार्थ्यांना केळीच्या एका नगाला ५८ पैसे तर सहावी ते आठवीच्या एका लाभार्थ्यांस नगाला ९० पैसे शासनाकडून दिले जातात.या किमतीत केळीच काय तर पुरक आहार कुठलाही पदार्थ बाजारात शक्य नाही.

सध्या फळ बाजारात व केळी व्यापाऱ्यांकडे केळीचा शोध घ्यावा लागतो. नियमित ३५० रुपये क्रेट मिळणारी केळी दोन दिवसांपासून ५०० ते ५५० रुपये दराने विक्री होत आहे.' गुरूजी' आधीच टॅक्सच्या कचाट्यात तर महागडा पुरक आहार पदरमोड करून नेहमी तरी कसा वाटतील ?

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

एका दृष्टीक्षेपात मध्यान्ह भोजन योजना-

जिल्ह्यातील शाळा - ४४३९

प्राथमिक- (जिल्हा परिषद) ३४८३

खाजगी प्राथमिक शाळा ७१४

माध्यमिक- २४२

लाभार्थी इयत्ता १ते ५ - ४,१४,४६४

लाभार्थी इयत्ता ५ ते ७ - २, ३३१७

जिल्ह्यातील एकुण लाभार्थी - ६ लाख ६७७८१

"मुळात छोट्या शाळेत योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकचा खर्च लागतो. त्यात पुरक आहारात महागलेली केळी आर्थिक गणित बिघडवते."

- बाळासाहेब पवार, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा हनुमान नगर

"पौष्टिक पदार्थ म्हणून पुरक आहारात केळीचा समावेश चांगला आहे. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे केळी परवडत नाही."

- सुवर्णसिंह राजपूत मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा करंजगव्हाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT