sonali.jpg 
नाशिक

जिद्दीला सॅल्युट! दिव्याखाली अभ्यास करत शेतकऱ्याच्या लेकीची उज्ज्वल कामगिरी...एकदा वाचाच

भाऊसाहेब गोसावी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (चांदवड) मातीचे घर, कुडाचे छप्पर, घरी वीजपुरवठा नाही...अशा स्थितीत रात्री दिव्याखाली अभ्यास करत बळीराजाच्या लेकीने गगनभेदी यश मिळविले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सोनाली छगन चव्हाण हिने बारावीत ८४ टक्‍के गुणांसह सरस्वती विद्याप्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातून अव्वल क्रमांक पटकावला. दिव्याखाली अभ्यास करताना सोनालीने केलेली कामगिरी उज्ज्वल अशीच आहे.

रात्र-रात्र दिव्याखाली अभ्यास करून यश

मुलीचे यश पाहून तिने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान सोनालीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर झळकतेय. वागदर्डी (ता. चांदवड) येथील सोनालीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगल व छगन चव्हाण यांची कन्या सोनालीने रात्र-रात्र दिव्याखाली अभ्यास करून यश मिळविले. हे गरीब दांपत्य आपल्या शेतातील मातीच्या घरात राहतात. घरची तीन-चार एकर जिरायती शेती. जवळ विजेची सोय नसल्याने घरी विजेचा दिवा कधी लागलाच नाही. सोनाली शाळेत हुशार, पण घरी वीज नाही. मात्र, जिद्दीच्या जोरावर तिने रोज रात्री दिव्याच्या प्रकाशात अकरा-बारापर्यंत अभ्यास केला. मुलगी अभ्यास करताना आई-वडिलांनाही तोपर्यंत जागे राहावे लागायचे.

सोनाली झोपल्यानंतर दिवा विझवत झोपणे हाच दिनक्रम...

दिवसभर शेतात काम करायचे अन्‌ रात्री मुलीबरोबर जागायचे. अभ्यास करताना सोनाली झोपी गेल्यावर दिवा विझवत झोपणे, हाच तिच्या आई-वडिलांचा दिनक्रम झाला होता. एकदा तर अभ्यास करता-करता सोनाली झोपी गेली अन्‌ विपरीत होता होता वाचले. दिव्यावर तिचे केस पडले... मात्र, दैव बलवत्तर चांगले म्हणून थोडक्‍यात संकट टळले. तेव्हापासून तिच्या अभ्यासाबरोबरच आई-वडिलांचे जागरण नित्याचे झाले.

मला आता डी.एड. करून शिक्षक होण्याचे स्वप्न आहे. आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिले असल्याने त्यांना हातभार लावण्याची इच्छा आहे. त्यांना नेहमी सुखी ठेवण्यासाठी आणखी शिकणार आहे. - सोनाली चव्हाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT