maha..police.jpg 
नाशिक

गुटखा विक्रेत्याकडून तडजोड भोवली; उपनिरीक्षकाची तडकाफडकी बदली 

दिपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गुटखा विक्रेत्याकडून तडजोड प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला चांगलेच अंगलट आल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. यावरून अजूनही अवैध धंदे सुरूच असल्याचे समोर आले आहे.

तडजोड प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला चांगलेच अंगलट
वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक डाॅ. प्रतापराव दिघावकर यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच नामपुर येथील फोपीर रस्त्यालगत एका काटेरी झुडुपात सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून मुसक्या आवळल्या होत्या. मात्र पुन्हा छुप्या पद्धतीने अवैद्यरित्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरात राज्यातून अवैद्यरित्या जनावरे वाहतूकीसह गुटखा सर्रासपणे आणला जात असल्याचे बोलले जात आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने हद्दीतील गुप्त माहितीच्या आधारे गुटखा विक्री होत असल्याची खबर मिळाली असता सदर गुटखा विक्रेत्याकडून लाखोंची तडजोड करून प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्नही केले होते. मात्र संबंधित गुटखा विक्रेत्याने थेट वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार केल्याने उपनिरीक्षकाला तडजोडीतील रक्कम परत करण्याची नामुष्की झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

संबधित उपनिरीक्षकाची तडकाफडकी बदली केल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. वरीष्ठ आधिका-यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्यरित्या वाळू, जणावरे, लाकूड वाहतूकीसह गावठी दारू विक्रीकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

परिसरातील छुप्या पद्धतीने जनावरे वाहतूक बंद व्हावी यासाठी प्रशासनाने कठोरपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. आम्ही याबाबत वरीष्ठ कार्यालयात पत्रव्यवहारही केले आहेत.-डाॅ. नितिन पवार, युथ फाउंडेशन अध्यक्ष ताहाराबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT