Subhash Avchat esakal
नाशिक

Subhash Avchat | कोणतेही लिखाण ठरवून लिहिले नाही : सुभाष अवचट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मी चित्रकार असून, लेखक नाही. माझी आवड चित्रकला असून, त्यातच मला रमण्यास आवडते. चित्रकारानंतर मी लेखक झालो आहे. कोणतेही लिखाण ठरवून लिहिले नाही. ओतूर या माझ्या गावाने मला बरंच काही दिले. माझी कला तेथूनच सुरू झाली, असा संवाद साधत चित्रकार, लेखक सुभाष अवचट यांनी समाजातील विविध विषयांवर नाशिककरांशी संवाद साधला. (Subhash Avchat statement No writing written with determination nashik news)

लेखक, चित्रकार सुभाष अवचट यांची खिडकी, दोन दीर्घकथा, डोंट पेंट द क्लू आणि रफ स्केचेस ही चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यानिमित्ताने प्रा. डॉ. वृंदा भार्गवे व पुस्तकांच्या संपादक ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे त्यांची शुक्रवारी (ता. २०) मुलाखत घेतली.

सुभाष अवचट यांचे लेखन व चित्रकारिता याबाबतच प्रवास यानिमित्ताने उलगडण्यात आला. अवचट यांनी आपल्या पुस्तकांविषयी माहिती दिली. तसेच चित्रांचे आपल्या आयुष्यातील स्थान, अनिल अवचट या मोठ्या भावाच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाला माजी आमदार हेमंत टकले, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे, प्रकाशक आनंद अवधानी उपस्थित होते.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

अस्वस्थ वर्तमानावर नेमके बोट

लहान मुलांच्या नजरेसमोर चित्रे नसतात, ते सतत मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. हजारो लोकांची बोटे नुसते इकडचे मेसेज तिकडे पाठवण्यात आणि गेम खेळण्यात व्यस्त आहेत.

एखादा चित्रपट एखाद्याला नको असेल, तर त्याच्यावर थेट बहिष्काराची भाषा होते आणि त्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. हे सगळे काय चालले आहे, असा संताप व्यक्त करत चित्रकार सुभाष अवचट यांनी सध्याच्या अस्वस्थ वर्तमानावर नेमके बोट ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT