Member of Parliament participating in the Savarkar Gaurav Yatra organized by BJP and Shiv Sena. Subhash Bhamre  esakal
नाशिक

Nashik Savarkar Gaurav Yatra : कॉँग्रेस घराणेशाही असलेला पक्ष : सुभाष भामरे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Savarkar Gaurav Yatra : काँग्रेस (Congress) हा घराणेशाही असलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाने देश अभिमान व त्यागाविषयी बोलू नये. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांपैकी स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक आहेत. (Subhash Bhamre statement about Congress dynastic party nashik news)

स्वातंत्र्य सैनिकांना भारत देश आपले दैवत मानतो. त्यांच्याबद्दल राहूल गांधी यांनी अपशब्द वापरल्यामुळे देशात आक्रोश निर्माण झाला आहे. मुळात सावरकर समजायला देश भक्तीचे अधिष्ठान असावे लागते असे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

येथील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. कॅम्प भागातील वीर सावरकर चौकातून जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, माजी गटनेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वीर सावरकर प्रतिमेचे व भारत मातेचे पूजन करून गौरव यात्रेला सुरवात झाली. खासदार डॉ. सुभाष भामरे गौरव यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ. भामरे म्हणाले की काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वीर सावरकर यांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर भाजप व शिवसेनेतर्फे राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

यावेळी गौरव यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘मी सावरकर’ लिहिलेली टोपी परिधान केली होती. बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या हातात आम्ही सारे सावरकर असे फलक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर व देशभक्तीपर घोषणांनी कॅम्प परिसर दुमदुमला होता.

या यात्रेत गौरव यात्रेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, माजी उपमहापौर नीलेश आहेर, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, भाजप तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, संघटक देवा पाटील, शहराध्यक्ष मदन गायकवाड, अशोक कांकरिया, बन्सीलाल कांकरिया, संजय काळे, दीपक पवार,

दादा जाधव, लकी गिल, अरुण पाटील, मंजूषा कजवाडकर, सुरेखा भुसे, नीता पठाडे, सुधीर जाधव, सुनील चौधरी, यु.आर.पाटील, हरिप्रसाद गुप्ता, सोमन्ना गवळी, प्रकाश मुळे, भरत पोफळे, योगेश पवार, जगदीश गोऱ्हे, रविश मारू, बापू चित्ते, नाना मराठे, बापू वाघ, पप्पू पाटील, सुनील शेलार, सचिन बाचकर, स्वप्नील भदाणे, श्याम गांगुर्डे, शुभम लोंढे,

कुणाल सूर्यवंशी, शरद पानपाटील, रवी हिरे, हेमंत पुरकर, दीपक जगताप, पावन शर्मा, मनोज शर्मा, अजिंक्य कन्नल, आनंद शर्मा, आकाश काळे, रवी काळे, सशित रनसिंह, स्वप्नील चव्हाण आदींसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

हरिहरेश्वर मंदिरात रक्तरंजित थरार! आईने पोटच्या मुलीवर केला धारदार शस्त्राने वार; स्वतःला संपवून घेण्याचाही प्रयत्न

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कृषी मेळावा

SCROLL FOR NEXT