Minister Subhash Desai
Minister Subhash Desai esakal
नाशिक

Mahavikas Aghadi Campaign | भाजपरूपी कौरवसेनेकडून आघाडीला घेरण्याचा प्रयत्न : देसाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाजपरूपी कौरवसेना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पदवीधर आणि सुशिक्षित मतदारांनी व्यक्त व्हावे, असे आवाहन करीत आज महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

महाविकास आघाडीतर्फे आज शुभांगी पाटील यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या प्रचारार्थ ही बैठक झाली.

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, सचिव विनायक राऊत, नेते खासदार अरविंद सावंत, पाचही जिल्हाप्रमुख, माजी आमदार, काँग्रेसच्या हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड आदी महाविकास आघाडी नेत्यांची प्रचार नियोजनासाठी बैठक झाली. (Subhash Desai trolling statement BJP attempt to encircle mahavikas aghadi maharashtra political nashik news)

श्री. देसाई म्हणाले, पदवीधर मतदार हे सुशिक्षित सुजाण मतदार असतात. भाजपकडे पात्र, लायक उमेदवार मिळत नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष इतर पक्षातील उमेदवारांना पळवितात. खासदार सावंत म्हणाले, या देशात जात-धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू असताना काँग्रेसतर्फे भारत जोडो सुरू आहे, म्हणून शिवसेना काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी आहे.

श्री. राऊत म्हणाले, दोन कोटी लोकसंख्येच्या मुंबईवर सत्ता मिळविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतात, त्यांच्या सभेला नागरिकांना फसवून आणले जात आहे. भाजपरूपी कौरवसेना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

मात्र भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. श्री आव्हाड यांनी पदवीधर काँग्रेस निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शुभांगी पाटील यांच्या सोबत असल्याचे सांगितले.

"महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल." - शुभांगी पाटील, शिवसेना पुरस्कृत उमेदवार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT