Subsidy to Gaushala in 14 talukas in district nashik news
Subsidy to Gaushala in 14 talukas in district nashik news esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यात 14 तालुक्यात 'या' सुविधांसाठी मिळणार गोशाळांना अनुदान!

संतोष विंचू

Nashik News : भाकड जनावरांची संख्या कमी नसल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी अनेक गोशाळा कार्यरत आहेत.

अर्थात या गोशाळांना स्वखर्चाने जनावरांचा सांभाळ करणेही तितके सोपे नाही म्हणूनच विनाकामाच्या वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करण्यासह चारापाण्याची, निवाऱ्याची सोय उपलब्ध करण्यासाठी शासनाने गोवर्धन सेवा केंद्र या योजनेतून अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. (Subsidy to Gaushala in 14 talukas in district nashik news)

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर वगळता उर्वरित तालुक्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या योजनेत बदल करून सुधारित योजना शासनाने लागू केली आहे. गोवंशी प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध आणणे तसेच विनाकामाच्या पशुधनाचा सांभाळ व संगोपन करणे हा यामागचा हेतू आहे.

राज्यातील ३२४ तालुक्यांचा योजनेत समावेश झाला आहे. प्रत्येक तालुक्यातून एका गोवंश संस्थेची निवड होणार आहे. यासाठी निकष व शर्ती देखील निश्चित केल्या आहेत. गोशाळा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी,

गोवंश संगोपनाचा कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असावा, पशुधनासाठी आवश्यक असलेली वैरण उत्पादनासाठी पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची किंवा ३० वर्षे भाडेपट्ट्यावरील किमान पाच एकर जमीन असावी, गोशाळेचे मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असावे आदी एकूण बारा प्रकारच्या निकषात बसणाऱ्या संस्थेची अनुदानासाठी निवड होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे आहे अनुदानाचे स्वरूप

ज्या गोशाळांमध्ये ५० ते १०० पर्यंत गोवंश आहे त्यांना १५ लाख रुपये, ज्यांच्याकडे १०१ ते २०० पशुधन आहे त्यांना २० लाख, तर २०० पेक्षा अधिक गोवंशीय पशुधन असलेल्या गोशाळांना २५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

पात्र गोशाळांना मंजूर अनुदानापैकी ६० टक्के अनुदान पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात ४० टक्के अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने ६५ कोटींची तरतूद केली आहे. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य संस्थेला २०१७ मध्ये अनुदान मंजूर करण्यात आले आहे, त्यामुळे हा तालुका वगळून उर्वरित १४ तालुक्यासाठी आता अनुदान मिळणार आहे.

या सुविधांसाठी अनुदान!

या योजनेतून नवीन शेड, चारा व पाण्याची व्यवस्था, विहीर, बोअरवेल, कडबा कुट्टी यंत्र, मूरघास प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती, गोमूत्र विक्री केंद्र, जुन्या शेडची दुरुस्ती आदी कामांसाठी अनुदानातून मिळणार आहे.

गोशाळांना वैरण लागवडीसाठी बियाणे व चारा उत्पादन करण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकणार आहे. गोशाळांचा निवडीसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तर प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक स्तरावरील समिती गठित करण्यात येणार आहे.

योजनेचा मुख्य हेतू असा

- दुग्धोत्पादनास, शेतीकामास, पशू पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या

गाय, वळू, बैल या गोवंशाचा सांभाळ करणे.

- या पशुधनासाठी चारा, पाणी, निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे.

- या केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे.

- गोमूत्र, शेण यापासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उपपदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भारतीय नागरिकच माझे उत्तराधिकारी- पंतप्रधान मोदी

Karveer Police : गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून; कोल्हापुरात बिनदिक्कतपणे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री?

HSC RESULT: कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी CA, CS व्यतिरिक्त करा 'हे' कोर्स

Scarlett Johansson vs OpenAI: ; स्कार्लेटच्या आवाजाची हुबेहुब 'कॉपी'! तिने कायद्याचा धाक दाखवताच OpenAI ची तलवार म्यान

Ahmednagar News : ऑनलाईन पद्धतीने तरुणास घटस्फोट; अहमदनगर कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT