subway found esakal
नाशिक

नाशिकमध्ये वाडा खोदकामात सापडला भुयारी मार्ग! विविध चर्चांना उधाण

युनूस शेख

नाशिक : जुने नाशिक परिसरात पुरातन संस्कृतीचा वारसा (Legacy of ancient culture) लाभला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जुने वाडे (wada culture) आहेत. बहुतांशी वाडे कोसळून दुरवस्था झाली आहे, तर काही वाडे सुस्थितीत आहेत. येथील देशपांडे गल्लीत असाच एक पुरातन दीक्षित वाडा आहे. त्या ठिकाणी खोदकाम सुरू असतानाच एक भुयारी मार्ग सापडला आहे. (subway found an underground passage)

वाडा खोदकामात भुयारी मार्ग सापडला

जुने नाशिक परिसरात पुरातन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. बहुतांशी वाडे कोसळून दुरवस्था झाली आहे, तर काही वाडे सुस्थितीत आहेत. येथील देशपांडे गल्लीत असाच एक पुरातन दीक्षित वाडा आहे. दोन तीन वर्षांच्या सतत पावसामुळे वाडा कोसळला आहे. त्या ठिकाणी केवळ वाड्याचे काही अंश होते. त्या ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पंधरा ते वीस दिवसांपासून जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम सुरू होते. बुधवारी (ता. १२) नेहमीप्रमाणे खोदकाम सुरू असताना जास्त खोलवर काम केल्याने त्या ठिकाणी भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार कामगारांना आढळून आले. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

हा मार्ग कुठपर्यंत जातो?

कामगारांसह वरिष्ठांनी पाहणी केली. मार्ग पूर्णपणे बुजलेला होता. आत जाण्यास जागा नव्हती. तसेच मार्गास तीन प्रवेशद्वारे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे; परंतु हा मार्ग नक्की कोठे जातो. याची माहिती मिळू शकली नाही. परिसरातील नागरिकांकडून हा मार्ग रामकुंडापर्यंत जात असल्याची चर्चा सुरू होती. सायंकाळी अंधार पडल्याने खोदकाम थांबविण्यात आले आहे. गुरुवारी (ता. १३) आणखी काही माहिती स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील देशपांडे गल्ली परिसरातील पुरातन दीक्षित वाड्यात खोदकाम सुरू असताना पुरातन भुयारी मार्ग सापडला. हा मार्ग कुठपर्यंत जातो, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. अंधार पडल्याने खोदकाम थांबविले आहे.

बघ्यांची गर्दी

देशपांडे गल्लीतील जुन्या पडक्या दीक्षित वाड्यात खोदकाम सुरू आहे. दुपारी या ठिकाणी ठिकाणी भुयारी मार्ग सापडल्याचे वृत्त परिसरात पसरले. परिसरातील नागरिकांनी मार्ग बघण्यासाठी गर्दी केली होती. मार्गाच्या उत्सुकतेचा घेऊन परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

SCROLL FOR NEXT