Mangala Bagul esakal
नाशिक

Success Story : कठोर मेहनत,‌ जिद्दीतून विवाहितेची गरुड भरारी; ‘आशिया पॅसिफिक’साठी मंगला बागुल यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

Success Story : कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी अन्‌ कष्ट करण्याची तयारी असेल, तर आकाशालाही सहज गवसणी घालता येते. कोणतेही यश संपादन करण्यासाठी वयाचे बंधन किंवा महिला-पुरूष भेदभावही आडवा येत नाही.

याचाच प्रत्यय पालविहीर (ता. सुरगाणा) येथील ४२ वर्षीय विवाहिता मंगला नामदेव गावित-बागुल यांच्या कतृत्त्वातून आला आहे. दक्षिण कोरियातील जोनबक येथे होणाऱ्या आशिया पॅसिफिक मास्टर्स गेम्स इंटरनॅशनल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असून, त्यासाठी त्या बुधवारी (ता. १०) दक्षिण कोरियासाठी रवाना होत आहेत. (Success Story Hard work stubbornness of married life Selection of Mangala Bagul for Asia Pacific nashik news)

येत्या शुक्रवार (ता. १२)पासून २० मेपर्यंत होणाऱ्या एथेलॅटिक्स (रनिंग) स्पर्धेत त्या सहभागी होणार आहेत. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतर्फे झालेल्या राष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत ४० वर्षांवरील महिला गटात पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक, चारशे व दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक, तर चार बाय शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे.

त्या मुळच्या वणीजवळील संगमनेर येथील असून, त्यांचे सासर पालविहीर येथील आहे. त्या सध्या दिंडोरी येथील मविप्रच्या माध्यमिक विद्यालयात इंग्रजी विषयाच्या शिक्षिका असून, त्यांचे पती नामदेव महादू गावित हे प्राध्यापक आहेत.

त्यांना दोन अपत्येही आहेत. असे असतानाही त्यांनी सातासमुद्रापार मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. शालेय जीवनापासूनच खेळाची आवड असल्याने त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळविलेली आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांच्या या यशाबद्दल मविप्रचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उत्तम वाघमारे, रतन चौधरी, पांडुरंग पवार, तुकाराम भोये, मनोहर चौधरी, परिणाम गावित, भास्कर बागुल, कृष्णा देशमुख, देविदास देशमुख, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष अशोक बागूल, ज्ञानेश्‍वर गायकवाड, योगेश भोये, हिरामण जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

"कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर कोणत्याही प्रकारच्या न्यूनगंडास जीवनात थारा देऊ नये. अपार मेहनत करण्याची तयारी व जिद्द ठेवल्यास महिलांना कोणतेच क्षेत्र अवघड नाही. वय झाले असले, तरी संसाराच्या गराड्यात अडकून न पडता सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रांत नाव कमावता येते."-मंगला बागुल, अॅथलेटिक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT