DipakPatil esakal
नाशिक

प्रतिकुलतेवर मात करणारा 'दीपक' बनला फौजदार; पंचक्रोशीत गौरव

सकाळ वृत्तसेवा

विराणे (जि.नाशिक) : घरची वडिलोपार्जित कोरडवाहू शेती... लहान भाऊ देशसेवेत... आई- वडील शेतात राबणारे... आर्थिक चणचणीत ग्रामीण भागात प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन लहान भावाने केलेल्या मदतीच्या जोरावर पोलिस निरीक्षक पदाचे धनुष्य पेलणाऱ्या वळवाडी (ता. मालेगाव) येथील दीपक पाटीलने घरात यशाचा ‘दीप’ प्रकाशमय केला. गावातून पहिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकराची ही कष्टमय यशोगाथा, तरूणांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

वळवाडी येथील चैत्राम पाटील व मालतीबाई या शेतकरी दांपत्याला दोन मुले. लहान किशोर पाटील भारतीय सैन्यात (Indian Army) दहा वर्षापासून सेवा देतोय. आई- वडील आणि लहान भावाची पत्नी सुवर्णा, पुतण्या तन्मय गावी वळवाडी येथे वास्तव्यास अन्‌ हंगामी शेती कामात व्यस्त. तर दीपक पाटील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नाशिक, पुण्यात व्यस्त. लहान भाऊ देशसेवेत असे हे कष्टकरी कुटुंब वेगवेगळ्या स्वप्नात गर्क! थोरल्या भावाच्या स्वप्नपूर्तीसाठी आर्थिक जबाबदारी सैन्य दलातील लहान भावाने पेलली. दीपक पाटीलला तीनवेळा यश आसपास असताना हुलकावणी देत होते. कुटुंबातील सर्वांची साथ असल्याने कोरोनाच्या (Corona) आगमनाची चाहूल लागत असताना २०१९ मध्ये उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

दोन वर्षे प्रतीक्षा काळ लोटल्यावर शारीरिक व अन्य सोपस्कार पार पडले आणि अखेर ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या पुत्राने बाजी मारत यश संपादन केले. गावी फक्त चौथीपर्यंत शिक्षणाची सोय. पाचवी ते बारावी असे आठ वर्षे वळवाडी ते विराणे पायी ये-जा करत शिक्षण घेतले. औरंगाबाद येथे डीएडचे (D.Ed) शिक्षण घेऊन शिक्षकाच्या नोकरीची प्रतीक्षा सुरू झाली. नेमक्या याच काळात शासनाने शिक्षक भरती बंद केली.

मालेगावच्या मसगा महाविद्यालयातून पदवीधर होत असताना शेतीकामात आई- वडीलांना मदत करणारा दीपक आपले शिक्षण वाया तर जाणार नाही ना, या विवंचनेत असताना सैन्य दलातील लहान भाऊ आणि आई- वडीलांनी उभारी दिली. स्वारी प्रारंभी नाशिक व नंतर पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली. प्रशासकीय सेवेसह अन्य पदांवर लक्ष केंद्रित करत अभ्यास केला आणि चार वर्षाच्या प्रचंड मेहनतीला फळ आले. वळवाडी या लहानशा गावातून पहिला पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला. या साऱ्या यशाचे श्रेय आई- वडील आणि लहानभाऊ, भावजयीला असल्याचे दीपक पाटील याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

"अथक परिश्रम घेण्याची वृत्ती आणि सर्वात सहजपणे मिसळणाऱ्या दीपक पाटीलच्या यशाने शेतकऱ्याच्या घरात आनंद पेरला आहे. दोन्ही भावंडांनी देशसेवेचा गणवेश महत्प्रयासाने मिळवला आहे."

- सतीश भामरे, मार्गदर्शक, भडाणे (ता. बागलाण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT