Nakul Deshmukh with his parents.
Nakul Deshmukh with his parents. esakal
नाशिक

Success Story : खडतर मेहनतीने सिन्नरचा नकुल देशमुख बनला IPS!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अलीकडे शासकीय सेवेतील नोकरीसाठी स्पर्धा अतिशय तीव्र झाली आहे. या स्पर्धेला सामोरे जात प्रसंगी अपयशाने खचून न जाता यशस्वी व्हायचे असेल, तर प्रचंड मेहनत, अभ्यासामध्ये सातत्य अत्यंत आवश्‍यक आहे.

अपयशावेळी पालकांना विश्‍वासात घेऊन प्रयत्न सुरू ठेवले, तर यश नक्कीच मिळते, असे २७ वर्षीय आयपीएस अधिकारी नकुल देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मूळचे सिन्नरचे भूमिपूत्र असलेले देशमुख सध्या केरळमधील कोय्यम जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक आहेत. येत्या शनिवारी (ता. १७) त्यांचा विवाह असल्याने ते सध्या मूळगावी सिन्नर येथे आले आहेत. (Success Story of Nakul Deshmukh of Sinner became IPS with hard work nashik news)

नकुल देशमुख यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. समाजातील तळागाळाच्या समस्या सोडवायच्या असतील, तर त्यासाठी व्यासपीठ पाहिजे. ते कशाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते, याचा नकुल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना बारकाईने विचार केला. अभियंता होऊन खासगी नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी फार काही करता येईल, यावर त्यांचा विश्‍वास नव्हता.

मात्र शासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातूनच समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविता येऊ शकतात. त्यासाठी नकुल यांनी राज्यसेवांतर्गत स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला अन्‌ येथूनच सुरू झाला त्यांचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास.

नकुल यांचे वडील राजेंद्र देशमुख मूळचे सिन्नरचे. वन विभागात लेखापाल म्हणून नोकरीला असल्याने नेहमी त्यांना कुटुंबीयांसह भ्रमंती करावी लागली. त्यामुळे नकुल यांचे प्राथमिक शिक्षण इगतपुरीत झाले. त्यानंतर नवोदय परीक्षेतील यशामुळे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण खेडगाव केंद्रीय विद्यालयात (ता. दिंडोरी) येथे झाले.

त्यांनतर पुणे विद्यापीठांतर्गत पुण्यातील काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करीत असतानाच त्यांनी राज्यसेवा परीक्षेसाठीचा अभ्यासही सुरू केला. तीन प्रयत्नांनंतर वयाच्या २५ व्या वर्षी चौथ्या प्रयत्नात त्यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली.

‘यूपीएससी’साठी गाठली दिल्ली

नकुल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असतानाच ‘यूपीएससी’चा अभ्यास सुरू केला. त्यासाठी कोणताही क्लास लावला नाही. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर मात्र त्यांनी दिल्ली गाठली. ‘यूपीएससी’साठीची स्पर्धा मोठी असल्याची जाणीव असल्याने नकुल प्रचंड मेहनत आणि अभ्यासात सातत्य ठेवत परीक्षेला सामोरे गेले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नात ते मुलाखतीपर्यंत पोचले.

चौथ्या प्रयत्नात त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि २०२० मध्ये सिन्नरचा हा भूमिपूत्र आयपीएस झाला. ‘यूपीएससी’ची तयारी करताना या परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून अभ्यासाची पद्धत जाणून घ्यावी आणि विषयाचे आकलन करून अभ्यास करावा. नेहमी संवाद साधत राहिल्यास त्याचा लाभ मिळतोच, असेही नकुल म्हणाले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

पालकांनीही सहकार्य करावे

नकुल म्हणतात, की कोणतेही पाऊल उचलताना पालकांचा विश्‍वास संपादन करणे महत्त्वाचे असते. पालकांना विश्‍वासात घेऊन मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. एक वा दोन प्रयत्नांत यश मिळेलच, असे नाही. त्यासाठी चार ते पाच वर्षांचाही कालावधी लागू शकतो. पालकांचाही संयम सुटायला लागतो. अशावेळी पालकांनीही मुलांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे मुलांना अधिक प्रेरणा मिळते.

गॅझेट्स‌ वापरा; पण ज्ञानासाठी

आजच्या प्रत्येक तरुणाच्या हाती मोबाईल आले आहेत. मात्र बहुतांश तरुणाई सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. गॅझेट्सचा वापर हा ज्ञानासाठी झाला पाहिजे, याच उद्देशानेच ते हाताळले पाहिजे. तरुणांनी ऑनलाइन गॅझेट्सचा वापर उपयुक्त ज्ञानासाठी केल्यास त्याचा लाभच होतो, असेही नकुल देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT