Pranav Jopale
Pranav Jopale esakal
नाशिक

Success Story : कातळगावचा प्रणव बनला लढाऊ विमानाचा पायलट!

रवींद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : तालुक्यातील कातळगावचा प्रणव जोपळे प्रशिक्षण घेऊन लढाऊ विमानाचा वैमानिक झाला असून लवकरच तो सैन्यात दाखल होईल. (Success Story Pranav jopale of Katalgaon became fighter pilot nashik news)

सप्तश्रृंगी देवी वसलेल्या डोंगररांगेत कातळगाव आहे. या डोंगर रांगेतील मोहनदरी आश्रमशाळा आहे. मोहनदरी व परिसरातील अनेक जण वैद्यकीय अधिकारी ,अभियंता या पदावर कार्यरत आहेत. याचाच कित्ता गिरवत सौ तारामती जोपळे व श्री राजु जोपळे या शिक्षक दाम्पत्याचा प्रणव या मुलाने लढाऊ वैमानिक पदाला गवसणी घालत उराशी बाळगलेले देशसेवेचे स्वप्न सत्यात उतरवून खडतर परिस्थितीतही यश मिळवता येते याचा परिपाठ तरुणाईस घालून दिला आहे.

प्रणवचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे झाले आहे. त्याने ११ वी पासूनच राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधनीसाठीचा अभ्यास सुरू केला होता.श्री हर्षल अहिरराव यांच्या सुदर्शन अकादमीत मार्गदर्शन घेतले आहे.संरक्षण दलातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत दोन वेळा गुणवत्ता यादीत आला आहे. म्हैसूर येथे वैद्यकीय चाचणी व मुलाखतीनन्तर खडकवासला पुणे येथील अकादमीत तीन वर्ष खडतर प्रशिक्षण घेतले असून हैद्राबाद येथे एक वर्ष हवाई दलाच्या अकादमीत प्रशिक्षण घेऊन उड्डयण अधिकारी बनला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

संरक्षण मंत्री , संरक्षण दलाच्या उच्च अधिकारी व आई -वडिलांच्या उपस्थित नुकतीच उड्डयण अधिकारी ही पदवी त्याला बहाल करण्यात आली आहे. प्रणव सध्या बिदर येथे देशासेवा बजावत आहे. त्याच्या या यशात आजोबा-आजी, आई वडील, काका-काकू, आत्या, मावशी यांचे आशीर्वाद, मोठा भाऊ अभियंता श्री प्रशांत जोपळे, बहीण प्रियंका यांचा पाठिंबा, श्री आहीरराव सर, कप्तान निलेश खैरनार सर, आप्तस्वकीय , शुभचिंतक व गावातील सर्व गावकरी यांचा वाटा असल्याचे प्रणव सांगतो. त्याच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत कौतुक तर तालुक्यात चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT