Ram Surse with a truck of wood & Sandalwood trees in a straight line. esaka
नाशिक

Nashik News : चंदनशेतीत ‘‌मिलियाडुबा’ लागवडीचा धाडसी प्रयोग!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : सततचा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी अन्‌ गारपिटीच्या संकटाने सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकरी होरपळून निघाला आहे. बेभरवशाचा असणारा शेती व्यवसाय बाजारभावातील चढउतारांमुळे अधिकच तोट्यात जात असताना चंदन लागवडीसारखा धाडसी प्रयोग याच सिन्नर तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.

राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित उजनी येथील युवा शेतकरी राम सुरसे यांनी त्यांच्या शेतात एक हेक्टरमध्ये चंदनासोबतच ‘‌मिलियाडुबा’ या फर्निचर उद्योगात मागणी असलेल्या नीमवर्गीय पिकाची अंतर लागवड केली. या ‌मिलियाडुबापासून त्यांना सहा वर्षांनी लागवड खर्च वजा जाता साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. (successful experiment of planting Miliaduba in sandalwood farming at sinnar Nashik News)

श्री. सुरसे यांच्यासह पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या एका गटाने सहा वर्षांपूर्वी दक्षिण भारतात जाऊन तेथील चंदनशेतीची माहिती घेतली. भविष्यात मोठा फायदा करून देणाऱ्या चंदनाची, त्यासाठी होस्ट ट्री म्हणून ‘‌मिलियाडुबा’ या फर्निचर उद्योगात मोठी मागणी असणाऱ्या निमवर्गीय वनस्पतीची आपापल्या शेत जमिनीत लागवड केली.

चंदन लागवड म्हणजे एक प्रकारे धाडसी प्रयोग या शेतकऱ्यांनी केला. चंदनासोबत लावलेल्या ‌मिलियाडुबा पिकातून मिळणारे उत्पन्न सुरक्षेसाठी वापरणे शक्य होणार आहे. श्री. सुरसे यांनी एक हेक्टर क्षेत्रात ‌मिलियाडुबाची सुमारे ७०० झाडे लावली होती. ही झाडे सहा वर्षांनी काढणी योग्य झाली. गुजरातेतील एका पेपर मिलने जागेवर पाच रुपये प्रती किलो या दराने झाडांची खरेदी केली.

त्यातून लागवड व मशागतीचा एक लाख रुपये खर्च वजा जाता श्री. सुरसे यांच्या हातात जवळपास साडेसहा लाख रुपये शिल्लक राहिले. परिसरातील चंदन लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही उत्पन्नाचे हेच गणित राहिले. त्यामुळे चंदन शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असल्याचा दावा राम सुरसे यांच्यासह नितीन कोकाटे, कन्हय्यालाल भुतडा, विजय शिंदे, चांगदेव सैंदरे, शिवाजी भाबड, भाऊसाहेब शिंदे, संदीप तिडके यांनी केला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

एक झाडापासून १२५० किलो लाकूड

‌मिलियाडुबाचे झाड जवळपास ७० फूट उंचीपर्यंत सरळसोट वाढते. साधारणपणे सहा वर्षांनी ‌मिलियाडुबा झाड तोडणी योग्य होते. ओळीत लागवड असल्याने सावलीत येणारी भाजीपाला पिके देखील घेता येतात. सिन्नरच्या शेतकऱ्यांनी गुजरातमधील गांधीधाम येथे कार्यरत पेपर मिलशी संपर्क साधला.

त्यांची टीम प्रत्येकाच्या शेतात येऊन पाहणी करून गेली. प्रतिकिलो पाच रुपये दर ठरवून झाडांची कापणी, वाहतूक कंपनीने केली. त्यासाठी कुशल मजूर पाठवले. लाकूड गाडीत भरून वजन केल्यावर तत्काळ पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्यावरच गाडी गुजरातकडे रवाना झाली.

म्हणजे रोखीचा व्यवहार झाल्याने इथे कोणतीही फसवणूक नाही. ‌मिलियाडुबा झाड तोडणी व वाहतूक करण्यासाठी परवानगी लागत नाही. एक झाडापासून सरासरी १२५० किलो लाकूड मिळाले. इतर फांद्या जळाऊ लाकूड म्हणून शेतातच टाकून देण्यात आल्या. झाडांची नोंद चंदनासोबतच सातबाऱ्यावर करण्यात आल्याने स्थानिक ग्रामपंचायतीचे पत्र माहिती दाखल वाहनासोबत दिले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT